शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कपाशीच्या फरदडीवर जोर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 18:07 IST

वाशिम: कपाशीवरील बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी हंगामातीत कापसाचा वेचा झाल्यानंतर कपाशी उपटून शेत पाच ते सहा महिने मोकळे ठेवणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश शेतकरी फरदडीची कपाशीही घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: कपाशीवरील बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी हंगामातीत कापसाचा वेचा झाल्यानंतर कपाशी उपटून शेत पाच ते सहा महिने मोकळे ठेवणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश शेतकरी फरदडीची कपाशीही घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.गत दोन वर्षांपासून राज्यभरात बोंडअळीचा प्रादूर्भाव होत असल्याने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. डिसेंबर महिन्यानंतर खाद्य उपलब्ध न झाल्यास शेंदरी वा गुलाबी बोंडअळी सुप्तावस्थेत जाते; परंतु फरदडीमुळे तिचा जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात येणाºया कपाशीवर तिचा पुन्हा प्रादूर्भाव होतो. यावर नियंत्रणासाठी कृषी विभाग जनजागृती करीत आहे. त्यांच्यावतीने पत्रकांद्वारे बोंडअळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कपाशीचे सुरुवातीचे वेचे आटोपल्यानंतर फरदडीचा विचार न करता कपाशी उपटून शेत मोकळे करणे, शेतात शेळ्या, मेंढ्या चारणे, डिसेंबर महिन्यानंतर ५ ते ६ महिने शेत कापूस विरहित ठेवणे आदि सुचना देण्यात येत आहेत. कपाशीच्या पºहाट्यांतही या किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने पºहाटीची गंजी शेताच्या बांधावर ठेवणे अयोग्य ठरते. त्यामुळे कापूस काढणीनंतर पºहाट्या, व्यवस्थीत न उघडलेली किडग्रस्त बोंडे, पालापाचोळा नष्ट करण्यासह पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरटी करण्याच्या सुचनाही कृषी विभागाकडून देण्यात येत आहेत; परंतु बहुतांश शेतकºयांना या सुचना कळल्याच नाहीत. त्याचे गांभिर्यही शेतकºयांना कळू शकले नाही. अद्यापही जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी फरदडीचा कापूस घेण्याच्या विचाराने शेतातील कपाशी उपटलेली नाही. त्यामुळे पुढील वर्षीही कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भिती आहे. या पृष्ठभूमीवर कृषी विभागाने गावागावांत मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिनिंग, प्रेसिंग मिलमध्येही कामगंध सापळ्यांचा अभावहंगामातील कपाशीचा वेचा झाल्यानंतर जिनिंग, प्रेसिंगमध्ये विक्री केली जाते. शेतकºयांनी विकलेल्या कपाशीपासून रुई, सरकी वेगळी करून कपाशीच्या गाठी तयार केल्या जातात. खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बी हंगाम संपेपर्यंतही ही कपाशी अनेक महिने जिनिंग, प्रेसिंगमध्ये राहते. त्यामुळे अशा ठिकाणी कामगंध सापळे, प्रकाश सापळे लावण्याच्या सुचना कृषी विभागाने दिल्या आहेत. या सुचनांचीही गांभिर्याने अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीcottonकापूस