शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: September 7, 2016 00:36 IST2016-09-07T00:27:58+5:302016-09-07T00:36:48+5:30
मांजरी : राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील शेतकरी सहादु भाऊसाहेब शेरकर (वय ४१) यांनी कर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपविली़ डाळिंबाची बाग दुष्काळाने उद्ध्वस्त झाल्याने

शेतकऱ्याची आत्महत्या
मांजरी : राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील शेतकरी सहादु भाऊसाहेब शेरकर (वय ४१) यांनी कर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपविली़ डाळिंबाची बाग दुष्काळाने उद्ध्वस्त झाल्याने शेरकर यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे़
सहादू शेरकर यांनी कडक उन्हाळयात टँकरव्दारे डाळिंबाला पाणी घालवून बाग वाचविण्याचा प्रयत्न केला़ मात्र गेल्या तीन वर्षापासून दुष्काळाने पिच्छा पुरविल्याने गणित कोलमडले़ डाळिंब शेतीसाठी साडेतीन लाख रूपये खर्च के ला़ मात्र डाळिंबाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने शेरकर यांनी मृत्युचा मार्ग स्वीकारला़ शेरकर यांनी एका सहकारी सोसायटीकडून एक लाख तर औषधासाठी सव्वालाख रूपये कर्ज घेतले होते़ डाळिंबावर कर्ज फे डण्याचे नियोजन होते़ कर्ज फिटणे शक्य नसल्याने शेरकर यांनी विषारी औषध घेतले. मयत शेरकर यांच्या मुलीचा पुढील महिन्यात विवाह होणार असताना या घटनेने मुसळवाडी परिसरात हळहळ व्यक्तकरण्यात येत आहे़ शेरकर यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, तीन भाऊ असा परिवार आहे़ (वार्ताहर)