लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरात वन्यप्राण्यांनी धूमाकुळ घातल्याने पिकांचे संरक्षण म्हणून अनेक शेतकºयांवर शेतात जागल करण्याची वेळ आली आहे.यंदा शेतकºयांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने शेतकºयांची चिंता वाढली होती. आता गत १० दिवसांपासून कमी- अधिक प्रमाणात पाऊस असल्याने शेतात पाणी साचत आहे. त्यातच काही ठिकाणी वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने पिकांची नासाडीदेखील होत आहे. मुंगळा परिसरात निलगाय, रोहि, रानडुकर, हरिण, वानर आदी वन्यप्राणी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके फस्त करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. जंगलाशेजारी शेती असणाºया शेतकºयांची चिंता यामुळे अधिकच वाढत आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण म्हणून मुृंगळा परिसरातील काही शेतकरी शेतातच ‘खोपडी’ तयार करून ’जागल’ करीत आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांनी वनविभागाकडे वारंवार केली. मात्र, बंदोबस्त झाला नाही.
वन्य प्राण्यांपासून पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांना करावी लागते ‘जागल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 11:57 IST