शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भाव मिळेना, २० रुपयांत विकावे लागताहेत आठ किलो टरबूज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 11:00 IST

Agriculture News : शेतकऱ्यांना २० रुपयांत आठ किलो टरबूज विकण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

कामरगाव : यंदा शेतकऱ्यांना नानाविध संकटाला सामोरे जावे लागत असून, कडक निर्बंध असल्याने कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांना २० रुपयांत आठ किलो टरबूज विकण्याची वेळ आली आहे.

सततच्या पावसाने मागील वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने खरिपातील तोटा रबीत भरून काढावा या उद्देशाने सिंचनाची सोय असलेल्या कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी शेतीमशागतीपासून बियाणे व खते, खरेदी तसेच पुढील मशागतीसाठीही खर्च केला. बाजारात टरबुजाची विक्री करण्याच्या वेळी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने तसेच आठवडी बाजार बंद करण्यात आले. परिणामी, टरबुजाची विक्री थांबली.

सुरुवातीला प्रतिकिलो दराने होणारी टरबुजाची विक्री नगावर येऊन पोहोचली. आणि त्याही पुढे जाऊन आजमितीला २० रुपयांत (दोन, अडीच किलोचे एक टरबूज) चार टरबूज विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

यामुळे शेतकरी गारद झाला आहे. आजमितीला टरबूज विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून लागवड खर्च निघणेही कठीण झाले आहे. संचारबंदी, कडक निर्बंधाचा सर्वाधिक फटका भाजीपाला व टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसला. अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर भाजीपाला सडल्याचे, याशिवाय टरबुजाची विक्री न झाल्याने टरबूज रस्त्यावर फेकून दिल्याचे प्रकार यापूर्वी कामरगाव परिसरात घडले आहेत. भाजीपाला व टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनाही शासनाने अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी