शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांमुळे शेतकरी धास्तावले; वनविभागही हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 18:03 IST

वाशिम : अलिकडच्या काळात वन्यप्राण्यांनी शेतकरी, शेतमजूरांवर हल्ले चढविण्याच्या घटनेत वाढ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अलिकडच्या काळात वन्यप्राण्यांनी शेतकरी, शेतमजूरांवर हल्ले चढविण्याच्या घटनेत वाढ होत आहे. विशेषत: हा प्रकार मानोरा, कारंजा तालुक्यात सर्वाधिक असून, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात वनविभागही हतबल ठरत आहे.सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला अत्यल्प बाजारभाव, बियाणे, खते व किटकनाशकांच्या वाढत्या किंमती आदी कारणांमुळे अगोदरच हैराण असलेल्या शेतकºयांसमोर अलिकडच्या काळात वन्यप्राण्यांनीदेखील अडचणी निर्माण केल्या आहेत. वन्यप्राण्यांपासून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. त्यातुलनेत वनविभागाकडून समाधानकारक नुकसानभरपाई मिळत नाही. नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, प्रशासकीय कार्यवाहीदेखील किचकट असल्याने अनेक शेतकरी प्रस्तावच सादर करीत नाहीत. वन्यप्राण्यांपासून पिकांची  होणारी नासाडी थांबविण्यासाठी शेतकरी आटापिटा करतात. मात्र, अलिकडच्या काळात वन्यप्राण्यांकडून हल्ले होत असल्यामुळे शेतकरी धास्तावले असल्याचे दिसून येते. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा झाला. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तर शेतकरी नेते तथा जि.प. सदस्य गजानन अमदाबादकर यांनी जंगलालगतच्या शेतीला तार कुंपन करण्यासाठी निधीची तरतूद करावी तसेच वन्यप्राण्यांचा बंदोस्त करावा, अशी मागणी लावून धरली. मात्र, अद्याप या मागणीची दखल कुणीही घेतली नाही. गत महिनाभरात रानडुकराने केलेल्या हल्ल्यात मानोरा तालुक्यातील वरोली येथील एका शेतकºयाचा मृत्यू तर सहा ते सात शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी वाशिम तालुक्यातील पिंपळगाव येथेही रानडुकराने हल्ला केल्याने एक शेतकरी गंभीर जखमी झाला. महिनाभरातील अशा आहेत घटना७ एप्रिलच्या सायंकाळदरम्यान रानडुकराने हल्ला चढविल्याने यामध्ये वरोली येथील शेतकरी सुरेश राजाराम डोईफोडे यांचा मृत्यू झाला. ७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास रुई गोस्ता येथील अजाबराव संभाजी मानतुटे यांच्यावरही रानडुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते. ३० एप्रिल रोजी मानोरा तालुक्यातील चोंढी शेतशिवारात मजुरीचे काम करीत असताना कमला डोमाजी घोडे (४५) यांच्यावर रानडुकराने हल्ला केला होता. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. मानोरा तालुक्यातील रोहणा येथील शेतमजूर यशवंत बारकू बोरचाटे यांच्यावर १ मे रोजी रानडुकराने हल्ला चढवून जखमी केले होते.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव