शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कारंज्यातील शेतकरी धडकले उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 18:45 IST

कारंजा तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता कारंजा तालुक्यातील कुपटी येथून १६ किलोमिटर पायदळ मोर्चा काढत शेकडो शेतकरी, शेतमजूर ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. 

ठळक मुद्देकुपटी ते  कारंजा १६ कि.मी. पायदळवारी विविध मागण्यांचे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा तालुक्यात गत ४ वर्षांपासून नैसर्गिक आणि शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी, शेतमजुर आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता कारंजा तालुक्यातील कुपटी येथून १६ किलोमिटर पायदळ मोर्चा काढत शेकडो शेतकरी, शेतमजूर ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. ११ नोव्हेंबर २०१७ रोजी कारंजा तालुक्यातील कुपटी येथील स्व. सुलभाताई इंगोले कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीला शिकणारा २२ वर्षीय विद्यार्थी मंगेश विष्णू लव्हाळे याने आपल्या वडिलाकडे असलेले कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून विहिरीत उडी घेउुन आत्महत्या केली होती. त्या विद्यार्थ्याची  आत्महत्या ही आत्महत्या नव्हे तर बलिदान ठरावे या करिता कुपटी येथील राहत्या घरापासून कारंजापर्यंत शेतकरी नेते तथा जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर व जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई गणेशपुरे यांच्या नेतृत्वात पायदळ यात्रा काढण्यात आली. या पायदळ यात्रेत शेतकरी व शेतमजुरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.तसेच माजी आमदार प्रकाश डहाके यांच्यासह जिल्हा मध्यावर्ती बँकेचे संचालक श्रीधर कानकिरड, ख.वि.स.चे अध्यक्ष बाबाराव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी व शेतमजुरांचा एल्गार मोर्चा कारंजा उपविभागीय अधीकारी यांच्या कार्यालयावर धडकला. सलग २ वर्षाच्या दुष्काळानंतर गतवर्षी परतीचा पाऊस व त्याच बरोबर नोटबंदीमुळे शेतकºयांना जबर फटका बसला. तूर पिकाचे अभूतपुर्व उत्पादन होवूनही शेतक-यांच्या नशिबी हालअपेष्टा व आर्थिक नुकसानीशिवाय काहीच आले नाही. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतू त्याचा किती शेतक-यांना लाभ मिळाला, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शेतकरी आत्महत्या या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा परिणाम आहे असा आरोप करीत आता तर शेतक-यांची शेतकरी मुलं व तरूण मुली आत्महत्या करीत आहेत, असा दावाही मोर्चेकºयांनी केला.आपल्या वेदना सरकारसमोर सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला. एल्गार मोर्चा तहसिल परिसरात आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहिर सभेत झाले. मान्यवरांनी उपस्थित शेतकरी व शेतमजुरांना मार्गदर्शन केले.  

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन