शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पडताळणीत अडकली शेतकऱ्यांची नुकसानभरपाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 15:50 IST

वाशिम : आॅगस्ट २०१८ दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६७०० हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित शेतकºयांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. यासंदर्भात गत महिन्याभरापासून केवळ पडताळणीच केली जात असल्याने नुकसानभरपाई कधी मिळणार? याची प्रतिक्षा कायम आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅगस्ट २०१८ दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६७०० हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित शेतकºयांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. यासंदर्भात गत महिन्याभरापासून केवळ पडताळणीच केली जात असल्याने नुकसानभरपाई कधी मिळणार? याची प्रतिक्षा कायम आहे. सन २०१८ मधील खरीप हंगाम जिल्ह्यातील २ लाख १ हजार शेतकºयांनी पीक विमा काढला होता. जिल्ह्यात १६ आॅगस्ट २०१८ ते १९ आॅगस्ट २०१८ दरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला होता. जवळपास ६७०० हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने कृषी व महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार शासनाकडे सविस्तर अहवाल पाठविण्यात आला होता. तसेच ४८ तासांच्या आत पीकविम्याची जबाबदारी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीकडे शेतकºयांनी नुकसानभरपाई संदर्भात तक्रारही केली होती. त्याअनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेताची पाहणी पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने केल्यानंतर, या नुकसानाबद्दल केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम शेतकºयांना मंजूर करण्यात आली. पीकविम्याबद्दल वैयक्तिक नुकसान झालेल्या शेतकºयांच्या यादीची पडताळणी पीकविमा कंपनीकडून गत महिनाभरापासून करण्यात येत आहे. अद्याप पडताळणीच सुरू असल्याने नुकसानभरपाईची रक्कम नेमकी केव्हा मिळणार? असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील ११४० शेतकºयांनी स्थानिक आपत्तीच्या निकषानुसार वैयक्तिक मदतीसाठी पीकविमा कंपनीकडे तक्रार केली होती.  या शेतकºयांच्या तक्रारीनुसार पडताळणी करून त्यांच्या खात्यात पीकविम्याबद्दल नुकसान भरपाईची रक्कम जमा होणे आवश्यक आहे. 

नुकसानग्रस्त शेतकºयांना पीकविम्याबद्दल आर्थिक मदत देण्यासाठी पडताळणी केली जात आहे. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नुकसानभरपाईबाबतची कार्यवाही केली जाईल.  - राहुल सहांशे,  जिल्हा समन्वयक, आयसीआयसीआय लोम्बार्ड

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी