शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यात शेतक-यांचा विरोध झुगारून कृषीपंपाची वीजजोडणी तोडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:32 IST

मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पावरील इंझोरी परिसरातील कृषीपंपाच्या जोडण्या खंडित करण्यासाठी आलेल्या तहसिलच्या पथकाला शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकºयांचा विरोध झुगारून या पथकाने कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला. 

ठळक मुद्देइंझोरी परिसरातील शेतकरी आक्रमक तहसिलदारांचे वाहन अडविले

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम): मानोरा तालुक्यातीलअडाण प्रकल्पावरील इंझोरी परिसरातील कृषीपंपाच्या जोडण्या खंडित करण्यासाठी आलेल्या तहसिलच्या पथकाला शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतक-यांचा विरोध झुगारून या पथकाने कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला. यंदा अपुरा पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर प्रकल्पांतील संपूर्ण पाणी आरक्षीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत; परंतु हे आदेश जारी होण्यापूर्वी शेकडो शेतक-यांनी रब्बीची पेरणी उरकली आणि प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर त्या पिकांना पाणी देणेही सुरू केले. दरम्यान, सद्या रब्बी हंगाम अर्ध्यावर आला असताना प्रशासनाने पाणी उपसा बंद करण्याचा पवित्रा घेतल्याने पिके सुकून शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे पाणी उपसा बंद करण्याच्या भूमिकेला शेतकºयांनी विरोध दर्शविला आहे.  यापूर्वीही २ डिसेंबर रोजी मानोराचे नायब तहसीलदार भोसले हे अडाण प्रकल्पावरील कृषीपंपाच्या जोडण्या खंडित करण्यासाठी आले असता शंभरापेक्षा अधिक शेतकºयांनी त्यांना मज्जाव केला होता. त्यावेळी कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला नव्हता. ६ डिसेंबर रोजी पुन्हा तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण व नायब तहसिलदार भोसले हे पथकासह आले असता, शेतकºयांनी या प्रकाराला विरोध केला. मात्र तहसिलदारांनी शेतकºयांचे काहीही म्हणने ऐकून न घेता विद्युत पुरवठा खंडीत केला.  या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी तहसिलदारांचे वाहनासमोर रस्त्यावर बसून विरोध दर्शविला. तहसिलदारांचे वाहन सुमारे एक तास अडविण्यात आले. वीजजोडणी तोडण्यापूर्वी किमान सूचना देणे अपेक्षीत होते, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली. धरणामध्ये राखीव पाणी ठेवूनही जास्त साठा आहे. या अतिरिक्त साठ्यातून सिंचनासाठी पाणी द्या, अशी आर्त हाक शेतकºयांनी दिली. शेतात पेरलेले पीक घेण्यासाठी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल झाले तरी चालेल अशी भूमिका घेत शेतकरी वीजजोडणी न तोडण्याच्या निर्णयावर ठाम होते.  तोडलेली विजजोडणी पुुन्हा जोडण्याकरिता या शेतकºयांनी आक्रमक होत तहसिलदारांच्या वाहनासमोर ठिय्या दिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसिलदारांनी मानोरा येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलाविली. तरीही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते. शेतक-यांची आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसताच, माजी पंचायत समिती सदस्य धनराज दिघडे व अन्य काही जणांनी मध्यस्थी करीत शेतक-यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेतक-यांनी तुर्तास माघार घेत तहसिलदारांच्या वाहनाला वाट मोकळी करून दिली. दरम्यान, पिके वाचविण्यासाठी मानोरा येथे कुटुंबियासह बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा उपस्थित शेतकºयांनी दिला. 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन