शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सोनल प्रकल्पातील पाण्यापासून शेतकरी वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 16:01 IST

शेलूबाजार (वाशिम) : सोनल प्रकल्पाच्या कालव्यातून रब्बी हंगामाकरिता पाणी मिळत नसल्याची तक्रार वनोजा येथील गणेश नामदेव गावंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी शेलूबाजार येथील सोनल प्रकल्प शाखा अभियंत्यांकडे ८ जानेवारीला केली.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार (वाशिम) : सोनल प्रकल्पाच्या कालव्यातून रब्बी हंगामाकरिता पाणी मिळत नसल्याची तक्रार वनोजा येथील गणेश नामदेव गावंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी शेलूबाजार येथील सोनल प्रकल्प शाखा अभियंत्यांकडे ८ जानेवारीला केली. पाण्याअभावी गहू पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकºयांनी वर्तविली आहे.   सन २०१८ मध्ये सोनल प्रकल्प १०० टक्के भरल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रब्बीची पेरणी झाली. यावर्षी  गव्हाचा पेरा चांगलाच वाढलेला आहे. परंतु सोनल प्रकल्प प्रशासनाकडून प्रत्येक शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. वनोजा येथील शेतकरी गणेश नामदेव गावंडे यांनी शेलूबाजार शाखेत जावून गहू पेरणी करावयाची असल्याने सिंचनासाठी पाणी मिळेल का? अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांना पाणी मिळेल असे आश्वासन मिळाल्याने रितसर अर्ज केला. गावंडे यांचेकडून सन २०१६-१७ मधील थकीत १८३ रुपयांचा भरणा करुन पावती दिली. त्यामुळे पाणी मिळण्याची आशा पल्लवीत झाल्याने २ एकरात ९ डिसेंबर रोजी गव्हाची पेरणी केली. परंतु अद्याप शेतात पाणी पोहचले नाही. अशीच गत परिसरातील अनेक शेतकºयांची झाली आहे. पेरलेले बियाणे व्यर्थ जावू नये म्हणून विहीरीचे पाणी देवून पिके वाचविली. परंतु यापुढे विहिरीत पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रकल्पातील पाणी मिळविण्यासाठी शेलूबाजार शाखेत वारंवार चकरा मारल्या. परंतु उडवा उजवीचे उत्तरे मिळत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. तºहाळा येथील अनेक शेतकºयांनी रब्बीची पेरणी केली. परंतु अद्याप त्यांच्या शेतात पाणी पोहोचले नसल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात सोनल प्रकल्पाचे प्रभारी शाखा अभियंता अनिल डांगे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यांनी कॉल रिसीव्ह केला नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :washimवाशिमDamधरणFarmerशेतकरीagricultureशेती