शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

किटकनाशक फवारणीच्या मार्गदर्शनाबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 15:31 IST

कृषी विभागाने जिल्हाभरात सोडाच इंझोरी येथेही भेट देऊन मार्गदर्शन करण्याची तसदी घेतली नाही, तर आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी इंझोरीत अशा प्रकारच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: किटकनाशकाच्या फवारणीमुळे इंझोरी येथील सहा मजुरांना विषबाधा झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. या पृष्ठभुमीवर कृषी विभागाने जिल्हाभरात मार्गदर्शन मोहिम राबविणे आणि आरोग्य विभागाने इंझोरी येथे भेट देऊन पाहणी करणे गरजेचे होते; परंतु कृषी विभागाने जिल्हाभरात सोडाच इंझोरी येथेही भेट देऊन मार्गदर्शन करण्याची तसदी घेतली नाही, तर आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी इंझोरीत अशा प्रकारच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आला नाही.  इंझोरी शिवारात सध्या पिकांवरील किड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून किटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. आपले व परिवारांचे पोट भरण्याकरिता काही परिसरातील मजुर ठेका पध्दतीने ही कामे घेऊन ती कामे लवकर संपविण्याच्या दृष्टीने रात्रंदिवस काबाड कष्ट करीत आहेत. या मजुरापैकी सहा मजुरांना थकवा, उलटी, जेवण पाणी न पचणे आदिचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर फवारणीचे किटनाशक औषध शरीरात गेल्याने विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामध्ये नंदु श्रीकृष्ण काळेकर (२५), अश्विन दिलीप तायडे (२८), गोलु चंद्रभान लायबर (३०), कृष्णा पुंडलीक दिघडे (४०), चंदाबाई संजय दिघडे (४०) व जामदरा येथील गणेश धुरट (३५), या मजुरांचा समावेश आहे. यापैकी अश्विन तायडे, गोलु लायबर, व गणेश धुरट यांच्यावर अकोला व यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. सहापैकी तीन मजुरांना चार दिवसांपूर्वीच रुग्णालयातून सुटीही देण्यात आली. त्यांची प्रकृतीही चांगली आहे. त्यानंतर दिलिप तायडे वगळता इतर दोघांच्या प्रकृतीतही सुधारणा झाली. अद्याप येथील काही मजुरांच्या ठेका पध्दतीने फवारणी सुरु असून, कदाचीत आणखी काही रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह व कृषी विभागाने इंझोरी जिल्हाभरात फवारणीकरिता मार्गदर्शन करणे अपेक्षीत होते; परंतु चार दिवस उलटले तरी, कृषी विभागाची मार्गदर्शन मोहीम व्यापक झाली नाही इंझोरीतही या दोन्ही विभागाचा कर्मचारी चार दिवसांतही आला नाही.

इंझोरी येथील कृषी सहाय्यक आणि मंडळ कृषी अधिकारी हे नियमित गावांना भेटी देत असून, त्यांनी याबाबत मार्गदर्शनही केले आहे. याबाबत कृषी विभाग सजग आहे. त्यातच विषबाधा झाल्याची कोणतीही तक्रार मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे आली नाही. तथापि, शनिवारी सकाळी येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येईल.-सचिन कांबळे,तालुका कृषी अधिकारी, मानोरा

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी