पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे ‘भीक मांगाे’ आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:49+5:302021-07-20T04:27:49+5:30

मागील पाच वर्षांपासून सतत शेतकऱ्यांवर कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा कहर होत आहे. शेतकऱ्यांच्या नावाने योजना काढायच्या नंतर ...

Farmers' begging for crop insurance | पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे ‘भीक मांगाे’ आंदाेलन

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे ‘भीक मांगाे’ आंदाेलन

Next

मागील पाच वर्षांपासून सतत शेतकऱ्यांवर कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा कहर होत आहे. शेतकऱ्यांच्या नावाने योजना काढायच्या नंतर त्यात निकषांचे पिल्लू सोडून मोकळे व्हायचे, अशी फसवणूक करणारी पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून सन २०१९-२० मध्ये कापसावर बोंडाळी तर सोयाबीन काढणीच्यावेळी अतिवृष्टीने झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले उभे पिकाचे नुकसान झाले. पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमधे असंतोष निर्माण आहे. याच अन्यायाविरुध्द मानोरा येथे बुधवार, २१ जुलै रोजी परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात भीक मांगो मोर्चा काढण्यात येत आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महत संजय महाराज, तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा, महत रमेश महाराज, समाज प्रबोधनकार पंकजपाल महाराज यांची या मोर्चात उपस्थिती राहणार आहे.

याबाबत तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी माेर्चात सहभागी हाेण्याचे आवाहन परिवर्तन शेतकरी संघटनेसह बंजारा क्रांती दलाचे डॉ. श्याम गव्हाणे, कर्मचारी संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रा.अनिल चव्हाण, शिवसग्राम सघटनेचे किशोर नाईक, वसंतराव नाईक मित्र मंडळाचे नितीन राठोड, विशाल राठोड, महेश राठोड,धनगर समाज संघटनेचे श्याम डोळस, बंजारा क्रांती दलाचे तालुका सचिन गोपीचंद चव्हाण, बाळा ऊर्फ विजय चव्हाण, पंजाब चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Farmers' begging for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.