शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांच्या वजनमापातील घोळप्रकरणी शेतकरी आक्रमक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 18:59 IST

वाशिम : खरीप हंगामात बी-बियाणे, खते खरेदी करताना वजनमापात फसवणूक होत असल्याने याप्रकरणी फसवणूक करणाºया सर्वांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांच्यासह शेतकºयांनी २० जून रोजी केली. 

ठळक मुद्देखते व बियाणे खरेदी करताना संबंधित बॅगचे वजन कमी भरत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी सुरूवातीपासूनच केल्या होत्या.वजनमापात फसवणूक करून शेतकºयांची लूट करणाºयांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी गवळी यांच्यासह शेतकºयांनी केली.

वाशिम : खरीप हंगामात बी-बियाणे, खते खरेदी करताना वजनमापात फसवणूक होत असल्याने याप्रकरणी फसवणूक करणाºया सर्वांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांच्यासह शेतकºयांनी २० जून रोजी केली. खते व बियाणे खरेदी करताना संबंधित बॅगचे वजन कमी भरत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी सुरूवातीपासूनच केल्या होत्या. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या सभेतही जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी, हेमेंद्र ठाकरे, उस्मान गारवे आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. या पृष्ठभूमीवर कृषी सेवा केंद्रांतून बियाणे व खते वजमकाटा करून मोजून द्यावी, असे निर्देश कृषी विभागाने दिले होते. तथापि, कृषी विभागाचे निर्देश धाब्यावर बसवून शेतकºयांना बियाणे व खते मोजून दिली जात नाहीत. ही बाब ‘लोकमत’ने १८ जून रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्येही उघडकीस आली होती. मागणी करूनही बियाण्यांच्या बॅग मोजून न देण्यामागे मोठे ‘अर्थ’कारण दडल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला. दरम्यान, १९ जून रोजी १९ जून रोजी मालेगाव तालुक्यातील एकांबा येथील शेतकरी गजानन गवळी यांनी खरेदी केलेल्या महाबिजच्या बियाणे बॅगचे वजन केले असता, ते एक किलोपेक्षा अधिक प्रमाणात कमी भरले. तसेच एका बॅगमधील बियाणे बोगस असल्याची शंका आल्याने संबंधितांनी हा प्रकार कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यावरून कृषी विभागाच्या चमूनेतपासणी केली असता,  बियाण्यांच्या काही बॅगचे वजन निर्धारित वजनापेक्षा कमी आढळून आले. याप्रकरणी कारवाईही प्रस्तावित केली. वाशिम जिल्ह्यात महाबिजचे जवळपास ५० हजार क्विंटलच्या आसपास बियाणे विक्रीसाठी असून, काही बियाणे बॅगचे वजन निर्धारित वजनापेक्षा कमी भरत असल्याने सर्व बॅगचे वजन करूनच शेतकºयांना विक्री करावी, वजनमापात फसवणूक करून शेतकºयांची लूट करणाºयांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी गवळी यांच्यासह शेतकºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी