शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

शेतकरी बनले कामरगावचे कैवारी;  स्वखर्चाने गावाला पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 16:26 IST

कामरगाव : ग्रामस्थांचे पाण्यासाठी होत असलेले हाल पाहून शेतकऱ्यांनी पुढे येवून कामगरवाच्या पाण्याची समस्या मिटवून ते कामरगाववासियांचे कैवारी बनलेत.

ठळक मुद्देगावात असलेल्या चारही विहीरी कोरड्या पडल्यात, पर्यायी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करु सुध्दा पाणी मिळेनासे झाले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाणी स्वत: खर्चाने पाईपलाईन टाकून गावाला पाणी पुरवठा सुरु केला आहे.  

कामरगाव  : कामरगावला बेंबळा व कुºहाड या दोन ठिकाणाहुन होणारा पाणी पुरवठा कुचकामी ठरला. ग्रामपंचायतने बेंबळा येथील पाणी पुरवठासाठी दोन विहीरी अधिग्रहण करुन सुध्दा कामरगावमध्ये पाण्यासाठी हाहाकार उडाला. ग्रामस्थांचे पाण्यासाठी होत असलेले हाल पाहून शेतकऱ्यांनी पुढे येवून कामगरवाच्या पाण्याची समस्या मिटवून ते कामरगाववासियांचे कैवारी बनलेत.गावात असलेल्या चारही विहीरी कोरड्या पडल्यात, पर्यायी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करु सुध्दा पाणी मिळेनासे झाले. अखेर ग्रामपंचायतने ग्रामस्थांसाठी पाण्याची सोय लावण्यासाठी गावलगतच्या काही शेतकºयाना गावातील भीषण पाणी टंचाई संदर्भात अवगत करुन गावाला पाणी देण्याची विनंती केली. ग्रामपंचायतच्या विनंतीला सुखदेवराव काळबांडे, गणीभाई , उत्तमराव पुंड , गणपतराव  गांजरे व धनराज हेडा या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाणी स्वत: खर्चाने पाईपलाईन टाकून गावाला पाणी पुरवठा सुरु केला आहे.   मिना भोने यांची भूतदया!कामरगावच्या जि.प.सदस्या मिना रामदास भोने यांनी आपल्या गाव लगतच्या शेतातील बोअरवेलवरुन कामरगाववासीयांनासाठी पाणी वाटप तर केलेच सोबतच मुक्याजनावरांसाठीही पाण्याची व्यवस्था केली. गावातील जनावरे तसेच जंगली प्राणी यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली. विशेष म्हणजे रात्री १२ वाजेपर्यंत बोअरवेल चालवुन व स्वत: तेथे उपस्थित राहून पाण्याची समस्या मिटविली.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीFarmerशेतकरी