शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात गळीताकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 15:09 IST

वाशिम: अमरावती विभागातील शेतकरी रब्बी हंगामातील गळीताबाबत उदासीन असून, यंदा सरासरी १९९१ हेक्टर क्षेत्रावर गळीताची पेरणी अपेक्षीत असताना पाचही जिल्ह्यात मिळून केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिके अर्थात तेलबियांची पेरणी झाली आहे.

वाशिम: अमरावती विभागातील शेतकरी रब्बी हंगामातील गळीताबाबत उदासीन असून, यंदा सरासरी १९९१ हेक्टर क्षेत्रावर गळीताची पेरणी अपेक्षीत असताना पाचही जिल्ह्यात मिळून केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिके अर्थात तेलबियांची पेरणी झाली आहे. नियोजित सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ९ टक्के आहे. वन्यप्राण्यांचा उपद्रव, तसेच नगण्य भाव यामुळे या पिकांकडे शेतकºयांनी पाठ केली आहे.अमरावती विभागात पूर्वी सूर्यफुल, करडई, तीळ, कराळ, हिवाळी भुईमुगाचे क्षेत्र लक्षणीय होते; परंतु गत काही वर्षांत या पिकांच्या पेºयात सतत घट होत असून, गेल्या पाच, सहा वर्षांत या पिकांकडे शेतकºयांनी पूर्णपणे पाठच केल्याचे दिसत आहे. सुर्यफुल, तिळ या पिकांना फारशी पाण्याची गरज नसते. तथापि, विपरित वातावरणाचा फटका या पिकांना बसतो, तसेच वन्यप्राणी आणि पक्ष्यांकडून या पिकांची मोठी नासाडी होते. त्यातच उत्पादन झाल्यानंतर बाजारात अपेक्षीत दर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे पाठ करीत आहेत. गतवर्षी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात मिळून ८६०० हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी कृषी विभागाने नियोजित केली होती. प्रत्यक्षात केवळ २१०८ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली होती. सरासरीच्या तुलनेत पेरणीचे प्रमाण केवळ २५ टक्के होते. यंदा विभागात समाधानकारक पाऊस पडला असताना केवळ १९९१ क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी अपेक्षीत होती. प्रत्यक्षात केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ९ टक्के आहे. विशेष म्हणजे जवस आणि तीळ या पिकांचे क्षेत्र निरंक आहे. यंदा बुलडाणा जिल्ह्यात ७१ हेक्टर, अकोला जिल्ह्यात ४ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ३९ हेक्टर, तर यवतमाळ जिल्ह्यात ६३ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे.अमरावती जिल्हा निरंकविभागातील पाच जिल्हे मिळून एकूण १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली असली तरी, अमरावती जिल्ह्यात यंदा एका हेक्टर क्षेत्रातही गळीत पिकांची पेरणी झालेली नाही. गतवर्षी अमरावती जिल्ह्यात ४२०० हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी अपेक्षीत असताना केवळ ९४५ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली होती, हे येथे उल्लेखनीय. गळीत पिकांच्या सतत घटणाºया पेºयामुळे शेतकरी या पिकांबाबत उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी