शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सावकार पिडिताला ५ वर्षानंतर मिळाला न्याय; जमीन परत करण्याचा आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 18:43 IST

वाकद (वाशिम) : येथील एका अवैध सावकार प्रकरणाचा पाच वर्षानंतर निकाल लागला असून सावकार पिडित आश्रू किसन बोडखे यांना सावकाराच्या ताब्यात असलेली जमीन परत करण्याचे आदेश सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी पारित केल्याची माहिती २३ मार्चला प्राप्त झाली. 

ठळक मुद्देवाकद येथील आश्रू बोेडखे यांची सर्व्हे नं. २९५ मध्ये ०.८५ हे.आर. जमीन आहे.जगन गंगा भारती यांच्याकडून घेतलेल्या १ लाख ५६ हजार रुपये रकमेतून सदर जमिनीची खरेदी करून देण्यात आली होती. खरेदी अवैध ठरली असून उपरोक्त मालमत्ता कर्जदार आश्रू किसन बोडखे यांना परत करण्याचे आदेश जिल्हा निबंधक यांनी दिले.

वाकद (वाशिम) : येथील एका अवैध सावकार प्रकरणाचा पाच वर्षानंतर निकाल लागला असून सावकार पिडित आश्रू किसन बोडखे यांना सावकाराच्या ताब्यात असलेली जमीन परत करण्याचे आदेश सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी पारित केल्याची माहिती २३ मार्चला प्राप्त झाली.  वाकद येथील आश्रू बोेडखे यांची सर्व्हे नं. २९५ मध्ये ०.८५ हे.आर. जमीन आहे. तथापि, एकलासपूर येथील जगन गंगा भारती यांच्याकडून घेतलेल्या १ लाख ५६ हजार रुपये रकमेतून सदर जमिनीची खरेदी करून देण्यात आली होती. सदर रक्कम व्याजासह परत देण्यासाठी वाकद येथील सदाशिव सखाराम पोपळघट यांच्याकडून बोडखे यांनी सन २०११ मध्ये ४ टक्के व्याजदराने २ लाख १८ हजार रुपये घेतले. त्याबदल्यात सदर जमिनीची खरेदी जगन भारती यांच्याकडून वनमाला सदाशिव पोपळघट यांच्या नावे करण्यात आली. मात्र, त्यानंतरही सदर जमीन बोडखे यांच्याच ताब्यात होती. त्यानंतर त्यांचा मुलगा संतोष आश्रू बोडखे यांनी जमिन परत मिळण्यासाठी तक्रार अर्ज सादर केला.सदर प्रकरणात विभागीय सहनिबंधक, अमरावती यांच्याकडे अपील करण्यात आले. तसेच उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर येथेही याचीका दाखल करण्यात आली. त्यावरून न्यायालयाने ९ सप्टेंबर २०१५ ला याचिका निकाली काढली व याबाबतची नोटीस जिल्हा उपनिबंधक कार्यालयास निर्गमीत करण्यात आली. त्यावरून सदर व्यवहार हा अवैध सावकारी स्वरुपाचा असल्याचे सिद्ध झाल्याने व सावकारी अधिनियम कलम १८ (२) अन्वये सदर खरेदी अवैध ठरली असून उपरोक्त मालमत्ता कर्जदार आश्रू किसन बोडखे यांना परत करण्याचे आदेश जिल्हा निबंधक यांनी दिले. 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी