शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

न उगवलेल्या बियाण्यांचा मिळणार मोबदला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 13:27 IST

जवळपास १३० पेक्षा अधिक बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात महाबीजचे १३० बॅग सोयाबीन बियाणे न उगवण्याचा प्रकार मानोरा तालुक्यात घडला होता. यामुळे शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. दरम्यान, ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करुन महाबीजचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन जिल्हा समितीच्यावतीने सलग चार दिवस संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली. यासंदर्भातील प्राथमिक अहवाल महाबीजच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला असून, अंतिम अहवालानंतर नेमका किती शेतकºयांंना मोबदला मिळू शकेल, हे निश्चित केले जाणार आहे.मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरात बहुतांश शेतकºयांनी प्रामुख्याने महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केली आहे. यातील काही शेतकºयांनी कृषी सेवा केंद्रांकडून जेएस ३३५, हे सोयाबीन वाण विकत घेतले होते. या वाणाच्या लॉट क्रमांक ५६९८ मधील बियाणे पेरणाºया शेतकºयांचे बियाणेच उगवले नसल्याने शेतकºयांना धक्का बसला. जवळपास १३० पेक्षा अधिक बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे केली. लोकमतने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून कृषी विभागासह महागीज प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर लोकमतचे वृत्त आणि शेतकºयांच्या तक्रारीची दखल घेऊन महाबीजचे प्रतिनिधी, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या ५ सदस्यीय पथकाने इंझोरी येथील शिवाराला भेट देऊन काही शेतकºयांच्या पेरणीची पाहणी सुरू केली. चार दिवस पेरणी झालेल्या शेतांची पाहणी केल्यानंतर महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांनी या प्रकाराचा प्राथमिक अहवाल त्यांच्या विभागीय कार्यालयाकडे सादर केला. या अहवालानुसार बियाणे न उगवल्याने शेतकºयांचे नुकसान झाल्याचे नमूद असल्याने शेतकºयांना मोबदला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तथापि, शेतकºयांनी केवळ जेएस ३३५ या वाणाचीच पेरणी केली काय, पेरणी करताना आवश्यक काळजी घेतली काय, यासह ज्या कृषीसेवा केंद्रातून बियाणे विकत घेण्यात आले. त्या कृषीसेवा केंद्राकडीन विक्रीच्या नोंदीची पडताळणी करून अंतिम अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतरच किती शेतकºयांना आणि किती प्रमाणात मोबदला मिळेल, हे निश्चित होणार आहे. गणेशपूर (ता.मंगरूळपीर) येथील शेतकºयांनीही बियाणे न उगवल्याची तक्रार केली आहे.कृषी सेवा केंद्रांकडून घेतली माहितीइंझोरी शिवारात महाबीजचे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारीनुसार शेतकºयांनी कोण्या कृषीसेवा केंद्रातून किती बियाणे घेतले, तसेच कोणत्या लॉटमधील बियाणे घेतले. याबाबत महाबीजच्या पथकाने माहिती घेतली आहे. आता या माहितीनुसार शेतकºयांच्या नुकसानाबाबतचा अंदाज काढण्यात येत असून, शेतकºयांनी जे वाण उगवले नाही, त्याच वाणाची पेरणी केली काय, हेसुद्धा कळणार असल्याचे महाबीजच्या अधिकाºयांनी सांगितले आहे. तथापि, शेतकºयांचे नुकसान झाले असेल, तर त्यांना पूर्ण मोबदला मिळेलच, असेही या अधिकाºयांनी सांगितले.आम्ही यंदाच्या खरीप हंगामात शेतात महाबीजचे जेएस ३३५ या सोयाबीन वाणाची पेरणी केली असून, पेरलेले बियाणे उगवलेच नाही. याबाबत तक्रार केल्यानंतर शेताची पाहणीही संबंधित पथकाकडून करण्यात आली. आता वस्तूस्थिती आणि नियमानुसार आम्हाला मोबदला लवकरात लवकर मिळावा, अशी अपेक्षा आहे.- गजानन ढोकशेतकरी इंझोरीइंझोरी शिवारातील शेतांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली आहे. या संदर्भातील प्राथमिक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करून प्रकाराची माहिती देण्यात आली. आता या संदर्भातील अंतिम अहवाल तयार करण्यात येत असून, सर्व पंचनामे आणि तांत्रिक माहितीनंतरच नेमके शेतकºयांचे किती नुकसान झाले ते निश्चित कळणार आहे.- डॉ. प्रशांत घावडेजिल्हा व्यवस्थापक महाबीज, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी