शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कामरगाव येथील दाम्पत्याने संकटांवर मात करीत केली रेशिम लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 15:14 IST

कामरगाव : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील पवार दाम्पत्याने अनेक संकटांवर मात करीत रेशीम लागवड केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील पवार दाम्पत्याने अनेक संकटांवर मात करीत रेशीम लागवड केली.  रेशीम निर्मितीसाठी पतीपत्नी खांद्याला खांदा लावून मेहनत घेत असून अनेक शेतकरी त्यांच्या या रेशीम शेती लागवडची पाहणी करुन समाधान व्यक्त करीत आहेत.कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील प्रगतशिल शेतकरी संदीप गुलाबराव पवार यांनी आपल्या कामरगाव शिवारातील २ एकर क्षेत्रावर जिल्हा रेशीम कार्यालयाच्या मार्गदर्शनात रेशिम शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली. अल्पावधीतच मेहनतीमुळे तुती बहरली. त्यानंतर त्यांनी रेशिम शेड उभारून त्यामध्ये २५० ची पहिली बॅच टाकली,  परंतु एकेदिवशी अज्ञात इसमाने पवार यांच्या रेशिम शेडला आग लावली. त्यात त्यांनी टाकलेली २५० ची बॅच जळून खाक झाली. यात संबंधित शेतकºयाचे अंदाजे १ लाख रूपयांचे नुकसान झाले.  कामरगाव येथील तलाठी भगत, ग्रामसेवक गोपाल मिसाळ व कृषी सहायक राऊुत यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच जिल्हा रेशिम अधिकारी मोरे व सहायक अधिकारी भईरम यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. परंतू सदर कार्यालयाने या मागणीकडे पाठ फिरवित कोणतीही मदत केली नाही. तरीही  घडलेल्या घटनेमुळे हताश न होता व खचून न जाता नव्याने रेशिम शेती करण्याचा सल्ला संदीप पवार यांच्या अर्धांगिनी कांचन पवार यांनी दिला. संकटात पत्नीची मिळालेली साथ पाहून संदीप पवार यांनी पुन्हा जिद्दीने रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. आज घडीला त्यांच्या शेतात २ एकर क्षेत्रावर हिरवीगार तुती बहरली असून त्यांनी पुन्हा २५० ची बॅच टाकून त्यापासून उत्पादन घेतले आहे.  सदर बॅचमधून त्यांना २ ते अडीच क्विंटल उत्पादन मिळाले असून बाजार भावानुसार त्याची किंमत ६० हजार रूपयाच्या जवळपास आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीKaranjaकारंजा