शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

आॅनलाईन पेरेपत्रक 'अपडेट' नसल्याचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 16:15 IST

वाशिम  : तालुक्यामध्ये लघु पाटबंधारे विभाग तथा स्थानिक स्तर लघु सिंचन विभागाचे भुसंपादनाचे काम सुरु आहे.  शेकडो शेतकऱ्यांचे जमीनीचे मुल्यांकन उपविभागीय कार्यालय वाशिम मार्फत करण्यात आले , परंतु आॅनलाईन पेरेपत्रक अपडेट नसल्याने , तलाठी दप्तरात पेरेपत्रकाची नोंद नसल्याने तसेच आॅनलाईन सातबारामध्ये रब्बी तथ्य उन्हाळी हंगामाची पेरेपत्रक समाविष्ट केलेले नसल्याने याचा ...

ठळक मुद्दे तलाठ्याच्या चुका आणि शिक्षा शेतकऱ्यांना मिळाली आहे आणि आता शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर उशिराने महसुल विभागाला जाग आली. २७ एप्रिल २०१८ पासुन सातबारा दुरुस्ती व पेरेपत्रक समावेश करण्याचे काम महसुल विभागाने सुरु केले.

वाशिम  : तालुक्यामध्ये लघु पाटबंधारे विभाग तथा स्थानिक स्तर लघु सिंचन विभागाचे भुसंपादनाचे काम सुरु आहे.  शेकडो शेतकऱ्यांचे जमीनीचे मुल्यांकन उपविभागीय कार्यालय वाशिम मार्फत करण्यात आले , परंतु आॅनलाईन पेरेपत्रक अपडेट नसल्याने , तलाठी दप्तरात पेरेपत्रकाची नोंद नसल्याने तसेच आॅनलाईन सातबारामध्ये रब्बी तथ्य उन्हाळी हंगामाची पेरेपत्रक समाविष्ट केलेले नसल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या प्रकारामुळे हंगामी तथा बारमाही बागायतीच्या जमीनीला कोरडवाहु जमीनीचे दर उपविभागीय कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पॅनलने दिले आहेत. तलाठ्याच्या चुका आणि शिक्षा शेतकऱ्यांना मिळाली आहे आणि आता शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर उशिराने महसुल विभागाला जाग आली.  २७ एप्रिल २०१८ पासुन सातबारा दुरुस्ती व पेरेपत्रक समावेश करण्याचे काम महसुल विभागाने सुरु केले. यामध्ये ही तलाठी हंगामी बागायत बारमाही बागायतीचे पेरे टाक ण्यास टाळाटाळ करीत असल्याचे महसुल विभाग भरुन घेत असलेल्या सिंचनाच्या कर पावत्यांवरुन निष्पन्न होत आहे.वाशिम तालुक्यातील देपुळ येथील शेतकरी महादेव वाघमारे, उमरा शमशोद्दीन येथील शेतकरी सुभाष तागड , वाई वार्ला येथील शेतकरी किसनराव मस्के तर मालेगाव तालुक्यातील  पांगराबंदी येथील शेतकरी प्रदीप रामराव घुगे यांनी तीन वर्षाचा सिंचनाचा कर रोहयोमध्ये भरुन तसे त्यांच्याकडे पुरावे असतांना तलाठ्यांनी आपले मनमानी धोरण वापरुन रब्बी व उन्हाळी पेरेपत्रक आॅनलाईन न केल्यामुळे शेकडो  शेतकºयांची हंगामी  बागायती जमीन असेल किंवा बारमाही बागायत सिध्द होत असेल तरीही त्यांना कोरडवाहु जमीनीचा मोबदला मिळत आहे.  याचा फटका वाशिम तालुक्यातील शेकडो शेतकºयांना मिळाला आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देवून हा घोळ दूर करण्याची मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.असा झाला पेरेपत्रकाचा घोळवाशिम तालुक्यामध्ये मागील तीन वर्षापासुन आनलाईन पेरेपत्रक भरणे सुरु असल्याने तलाठी दप्तर सातबारामध्ये पेरेपत्रक भरणे बंद आहे, परंतु जे शेतकरी ओलीत करतात, त्यांच्याकडुन रोहयो कर, शिक्षण कर, म्हणजे ओलीताचा कर वसुल केल्या जातो या कर वसुलीच्या याद्या दरवर्षी तलाठी तहसीलमध्ये जमा करतात.  या याद्याच्या नक्कला काढल्यास कोणाची जमीन हंगामी बागायत आहे किवां बारामाही बागायत असल्याचे सिध्द होते. या याद्यामध्ये नाव असुन तलाठ्याने पेरेपत्रक कोरडवाहुच भरल्याने शेकडो प्रकल्प बाधीत शेतकºयांना कोरडवाहु शेतीचा मोबदला मिळत आहे. तरी याकडे नव्याने आलेल्या जिल्हाधिकारी यांनी रोहयो कर भरणाºया शेतकºयांचे पेरेपत्रक बागायती भरावे तसेच तलाठ्याच्या चुकीने प्रकल्प बाधीतांना त्यांच्या जमीनीचे मुल्यांकन कोरडवाहु  झाले असेल तर त्यांचे पुर्नमुल्यांकन करुन त्यांना बागायती जमीनीचे दर द्यावेत व रोहयो करानुसार चुका करणाºया तलाठयावर जबाबदाºया निश्चित करुन त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी