शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही आत्महत्या अपात्र ठरविण्यावरच भर!

By admin | Updated: May 24, 2016 02:04 IST

वाशिम जिल्ह्यातील ३१ आत्महत्या प्रकरणापैकी १0 अपात्र; ४ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे चौकशीत.

विवेक चांदूरकर / वाशिम
गत तीन वर्षांपासून जिल्हय़ात दुष्काळ असून, शेती व्यवसाय पूर्णत: मोडकळीस आला आहे; मात्र त्यानंतरही शासन शेतकर्‍यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यावरच भर देत आहे. जिल्हय़ात २0१६ साली आतापर्यंत झालेल्या ३१ आत्महत्यांपैकी १0 आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या असून, ४ आत्महत्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
जिल्हय़ात तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळ आहे. पावसाचे प्रमाण घटले असून तीन वर्षामध्ये सरासरीच्या ५0 टक्के कमी पाऊस पडला आहे. अल्प पाऊस व पावसात पडत असलेल्या दडीमुळे उत्पादनात प्रचंड घट आली आहे. गतवर्षी पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी उत्पादन झाले. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. दोन वेळच्या जेवणाचीही आबाळ होत आहे. त्यातच जिल्हय़ात उद्योगधंदे नसून, रोजगार हमी योजनेची कामेही ठप्प आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना रोजगारही उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकर्‍यांना आत्महत्येचा मार्ग अवलंबवावा लागत आहे. जानेवारी २0१६ पासून आतापर्यंत पाच महिन्यातच ३१ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. जानेवारी महिन्यात ९ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्येची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात ६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, यापैकी दोन प्रकरणे अपात्र ठरविण्यात आले. मार्च महिन्यात ८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून, यापैकी अध्र्या म्हणजेच ४ आत्महत्यांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. एप्रिल महिन्यात सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केला असून, यापैकी तीन प्रकरणे चौकशीत आहेत. तर मे महिन्यात एका शेतकर्‍याने आत्महत्या केली असून, सदर प्रकरण चौकशीत ठेवण्यात आले आहे. सर्वात जास्त आत्महत्या जानेवारी महिन्यात झाल्या.