शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून जलसंधारणाची सोय!

By admin | Updated: August 10, 2016 01:23 IST

वाळकी-दोडकीत ८५0 एकर जमीन सिंचनाखाली.

सुनील काकडे वाशिम, दि. 0९: कधीकाळी कोरडवाहू जमिनीवर पारंपरिक पिके घेताना पाण्याच्या थेंबासाठी तरसणार्‍या वाळकी-दोडकी या गावांमध्ये लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे आजरोजी जिकडे-तिकडे खळखळून वाहणार्‍या पाण्याचे पाट दिसून येतात. यामुळे तब्बल ८५0 एकर जमीन सिंचनाखाली आली असून दोन्ही गावांचा कायापालट झाला आहे. दरवर्षीच पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य निर्माण होत असल्याने वाळकी-दोडकी या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. खरिप हंगामादरम्यान शेतातील विहिरी कोरड्याठाण्ण पडायच्या. जवळपास कुठलेच मोठे धरण, तलाव नसल्याने कोरडवाहू जमिनीतून पावसाच्या पाण्यावर विसंबून राहत, मिळेल तेवढे उत्पादन घ्यावे लागत असे. रबी हंगामात तर सिंचनाचा मोठा प्रश्न गावातील शेतकर्‍यांना भेडसावयाचा. या विपरित परिस्थितीवर मात करून वाळकी-दोडकी या गावांमध्ये जलसंधारणाची शाश्‍वत सोय निर्माण व्हावी आणि शेतकर्‍यांना जाणवणारा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, यासाठी दोडकी येथील सामाजीक कार्यकर्ते सुभाषराव नानवटे यांनी भगिरथ प्रयत्न करून जलसंधारणाचे महत्व गावकर्‍यांना पटवून दिले. त्यांच्या हाकेला ह्यओह्ण देत गावकर्‍यांनी देखील या कार्यात स्वत:ला झोकून देत ठिकठिकाणी पावसाचे पाणी अडविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. सुभाषराव नानवटे यांनी कृषी विभाग, कृषी समृद्धी योजना, भुजल सर्वेक्षण यंत्रणा, रतन टाटा ट्रस्ट स्वयंशिक्षण प्रयोग, जिल्हा परिषद, स्थानिक स्तर यासह इतर यंत्रणांकडून जलसंधारणाच्या कामांकरिता भरीव निधी मिळविला. त्यास लोकसहभागाची जोड मिळाल्याने वाळकी-दोडकी या गावांमध्ये आजमितीस ठिकठिकाणी पाणी अडविणे शक्य झाले आहे. यामुळे शेतांमधील पिकांसाठी लागणारे पाणी उपलब्ध होण्यासोबतच गावात यापुढे कधीच कोरडा दुष्काळ उद्भवणार नाही, याची तजवीज करून ठेवण्यात गावकर्‍यांना यश प्राप्त झाले आहे. आगामी रबी हंगामात या पाण्याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे.