शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जलशक्ती अभियानातून अतिरिक्त सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 15:37 IST

१ कोटी ४३ लाख रुपये खर्च करून केलेल्या पुनर्भरण क्षमतेच्या कामामुळे जवळपास १ लाख लिटर पाण्याची साठवणूक झाली आहे तसेच या उपक्रमांतर्गत ७४४८ वृक्षलागवड पुर्ण करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम : महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफार्मेशन फाऊंडेशन, युनिसेफ इंडिया आणि भारत सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत राबविलेल्या जलशक्ती अभियानात जिल्हयातील १० गावांचा समावेश असून, या गावांमध्ये १ कोटी ४३ लाख रुपये खर्च करून केलेल्या पुनर्भरण क्षमतेच्या कामामुळे जवळपास १ लाख लिटर पाण्याची साठवणूक झाली आहे तसेच या उपक्रमांतर्गत ७४४८ वृक्षलागवड पुर्ण करण्यात आली.या अभियानात जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील वाई, किनखेड, वढवी, लोहारा, किसाननगर, शेवती, मांडवा तसेच मालेगाव तालुक्यातील कवरदरी, वाडीरामराव व पिंपळशेंडा या गावांचा समावेश करण्यात आला आहे. पेयजल आणि आरोग्य विभागाने जलशक्ती अभियान ही मोहिम आखून राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये २० गटांची निवड केली होती. यात वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा ८ जुलै २०१९ 9 ते १५ सप्टेंबर २०१९ असा होता. दुसरा टप्पा १ आॅक्टोबर रोजी सुरू झाला आणि ३० नोव्हेंबर २०१९ रोजी समाप्त झाला. या कालावधीत जिल्ह्यातील १० गावांमधून युनिसेफच्या तांत्रिक साह्याने जलशक्ती अभियान राबविण्यात आले. अभियान कालावधीत जमिनीत पाणी जिरविण्यासाठी खड्डे खोदणे, विहिरीमधील गाळ काढणे, शॉक पिट, रुफटॉप रेन वॉटर, पब्लीक वॉल रिचार्ज शॉफ्ट, नाला अशी जलसंधारणाची कामे करण्यात आली. वनीकरणाची कामे, व्हीएसटीएफ प्रकल्पातील १० गावात प्रभावीपणे राबविण्यात आली. या कामांमुळे जवळपास १ लाख लिटर पाण्याची साठवण करण्यात आल्याचा दावा यंत्रणेला केला. या पाण्याचा लाभ १९५२ कुटुंबांना होणार असून यात ६०६६ महिला तर ५५३ बालकांनाही होणार आहे. जल शक्ती अभियानामध्ये केलेले नियोजन, क्षमता निर्मितीसाठीचे प्रयत्न, अंमलात आणलेल्या प्रक्रिया, भागीदारी, तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर या सर्व घटकांमुळे यश अधोरेखीत झाले आहे. ग्रामीण भागात सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी स्थानिक रहिवाशांचा सहभाग आणि पंचायती राज्ज पद्धती अधिक मजबूत व्हावी यासाठीची कार्यपद्धती कौतुकास्पद असून या सर्व गोष्टींचे अनुकरण जिल्ह्याच्या इतर भागात करून तेथेही पाणी सुरक्षेसाठी प्रयत्न करता येतील, असे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक म्हणाले.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार