शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

थेट हस्तांतरण योजनेतून शालेय गणवेश वगळला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:41 IST

थेट हस्तांतरण योजनेतून शालेय गणवेश वगळण्यात आला असून, तसे आदेश वित्त विभागाने ४ जुलै रोजी काढले असून, शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्देअनुदानाचा गैरवापर थांबावा या उद्देशाने वस्तू स्वरुपात देण्यात येणारे अनुदान प्रक्रियेत ५ डिसेंबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयाने बदल करण्यात आले.अनुदान वस्तूऐवजी रोख स्वरुपात थेट लाभार्थींच्या बँक खात्यात (डीबीटी) थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत दिले जाते. थेट लाभ हस्तांतरण योजनेतून चालू शैक्षणिक वर्षाकरिता ‘गणवेश’ ही वस्तू वगळण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमधून वस्तू स्वरुपात अनुदान दिले जात होते. दोन वर्षांपासून वस्तू स्वरुपात अनुदान देण्याऐवजी रोख स्वरुपात थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केले जात आहे. गतवर्षी शालेय गणवेशाची रक्कमही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करताना ‘तांत्रिक’ गोंधळ उडाला होता. हा तांत्रिक गोंधळ यावर्षी दूर करण्यासाठी थेट हस्तांतरण योजनेतून शालेय गणवेश वगळण्यात आला असून, तसे आदेश वित्त विभागाने ४ जुलै रोजी काढले असून, शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत.समाजातील विविध घटकांसाठी शासनातर्फे कल्याण योजना राबविल्या जातात. योजनांमधील अनुदानाचा गैरवापर थांबावा या उद्देशाने वस्तू स्वरुपात देण्यात येणारे अनुदान प्रक्रियेत ५ डिसेंबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयाने बदल करण्यात आले. त्या अनुषंगाने सदर अनुदान वस्तूऐवजी रोख स्वरुपात थेट लाभार्थींच्या बँक खात्यात (डीबीटी) थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत दिले जाते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत पात्र शालेय विद्यार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यात गणवेशाची रक्कम जमा केली जात होती. शून्य शिल्लकीवर बँकेने खाते उघडून देण्यास टाळाटाळ केल्याचा फटका गतवर्षी हजारो विद्यार्थ्यांना बसला. बँक व्यवहारासाठी एसएमएस शुल्क, जीएसटी शुल्क, किमान रक्कम शुल्क अशी विविध प्रकारची शुल्क आकारणी बँकांकडून  करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना गणवेशाची पूर्ण रक्कम मिळू शकली नव्हती. यावर्षी या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून थेट लाभ हस्तांतरण योजनेतून चालू शैक्षणिक वर्षाकरिता ‘गणवेश’ ही वस्तू वगळण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी शालेय गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यात जमा न करता त्या-त्या जिल्हास्तरावर गणवेशाचा निर्णय घेतला जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात शालेय व्यवस्थापन समितीवर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याचा निर्णय सोपविण्यात आला आहे. गणवेशाची रक्कम शालेय व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केली जाणार असून, या समितीतर्फे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिले जाणार आहेत.

 शालेय गणवेशासंदर्भात वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले असून, शालेय व्यवस्थापन समितीतर्फे पात्र विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाणार आहेत.- अंबादास मानकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा