शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

 मंजुरीनंतरही गावांत टँकर पोहोचलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 14:05 IST

आठ दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली खरी; परंतु अद्याप यातील एकाही गावांत टँकर पोहोचले नाही.

ठळक मुद्दे सहा ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव सादर केले.णी पुरवठा करण्यास मंजुरी दिल्यानंतरही आजवर एकाही गावांत टँकर पोहोचले नाही. पाणीटंचाई निवारणाची प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच असून, ग्रामस्थांच्या घशाची कोरड मात्र कायमच आहे. 

- अरूण बळी   

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची होरपळ सुरू आहे. अशात तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव सादर केले. या प्रस्तावांना आठ दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली खरी; परंतु अद्याप यातील एकाही गावांत टँकर पोहोचले नाही. त्यावरून पाणीटंचाई निवारणाबाबत प्रशासन किती गंभीर आहे, ते स्पष्ट होत आहे.मालेगाव शहरासह तालुक्यात ११४ गावे असून, यातील २८ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांतील ग्रामस्थांच्या घशाला पडलेली कोरड मिटविण्यासाठी ३० ग्रामपंचायतींनी विहिरी, कूपनलिका अधीग्रहणाचे, तर ८ ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्यासाठी पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर केले. त्यापैकी विहिरी, कूपनलिका अधीग्रहणाचे २५, तर टँकरचे ६ प्रस्ताव उपविभागीय स्तरावरून जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आले. त्यापैकी विहिरी, कूपनलिकेचे ११ प्रस्ताव, तर टँकरचे सहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यामुळे संबंधित गावांतील लोकांची तहान भागणे अपेक्षीत होते; परंतु स्थिती अगदी या उलट आहे. जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांपूर्वी सहा गावांसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजुरी दिल्यानंतरही आजवर एकाही गावांत टँकर पोहोचले नाही. त्यामुळे प्रशासनाची पाणीटंचाई निवारणाची प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच असून, ग्रामस्थांच्या घशाची कोरड मात्र कायमच आहे.  खैरखेड्यात पोहोचलेले टँकर उभेच मालेगाव तालुक्यातील राजुरा, वरदरी, देवठाणा खांब, खैरखेडा आणि   पिंपळवाडी या गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजुरी दिली खरी; परंतु एकाही गावात टँकर पोहोचले नसल्याचे वास्तव आहे. त्यातच खैरखेडा येथे सोमवार १३ मे रोजी पाणी पुरवठ्यासाठी टँकर आले खरे; परंतु या टँकरमधून गावातील विहिरीत पाणी सोडण्यासाठी आवश्यक साहित्यच नसल्याने हे टँकर जागेवरच उभे आहे.  वॉटर न्युट्रल गांगलवाडीच पाणीटंचाई मालेगाव तालुक्यातील ज्या सहा गावांत टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला. त्यात जलयुक्त शिवारची मोठ्या प्रमाणात कामे झालेल्या गांगलवाडीचा समावेश असून, सदर गाव वॉटर न्युट्रलच्या यादीत आहे. त्यामुळे या गावांत पाणीटंचाई कशी, हे पटवून देणारे पत्र जिल्हाधिकाºयांनी कृषी विभागाला सादर करण्यास सांगितले. कृषी विभागाने याबाबतचे पत्रही सादर केले आहे.  

महिनाभरापूर्वी प्रस्ताव सादर केल्यानंतर सहा दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली. त्यामुळे गावात टँकर येण्याची आम्हाला अपेक्षा होती. सोमवार १३ मे रोजी टँकर गावात आले; परंतु टँकरमधून विहिरीत पाणी सोडण्यासाठी आवश्यक साहित्यच नसल्याने चालक निघून गेला. त्यामुळे या टँकरचा फायदा झाला नाही. -आशा निवास शेळकेसरपंच, खैरखेडा    गांगलवाडी येथे दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. पर्याय नसल्याने टँकरचा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यात त्रुटी काढण्यात आल्या. याबाबत कृषी विभागाचा प्रस्तावही सादर करण्यात आला; परंतु गावात टँकर पोहोचलेच नाही. -अन्नपूर्णा दिलिप भुरकाडेपं.स. सदस्य मालेगाव --------------------------

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई