कामरगावात सोयाबीनपासून निर्मित गणेशाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST2021-09-13T04:40:53+5:302021-09-13T04:40:53+5:30

कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची अनेक वर्षांची परंपरा असून आजही ८ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने ही परंपरा ...

Establishment of Ganesha made from soybean in Kamargaon | कामरगावात सोयाबीनपासून निर्मित गणेशाची स्थापना

कामरगावात सोयाबीनपासून निर्मित गणेशाची स्थापना

कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची अनेक वर्षांची परंपरा असून आजही ८ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने ही परंपरा जोपासल्या जात आहे. अलीकडे गणेशाच्या मोठमोठ्या व प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्ती विसर्जित करणे कठीण होत असल्याने प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत कामरगाव येथील जय भवानी जय शिवाजी गणेश मंडळाने सोयाबीनपासून बनविलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना यंदाच्या केली आहे. मंडळाचे सदस्य गजानन राऊतकर यांनी इतर सदस्यांच्या सहकार्याने २० दिवसाच्या मेहनतीने केवळ ९०० रुपयांच्या खर्चात ही मूर्ती साकारली आहे. मूर्ती बनविण्यासाठी राऊतकर यांना ७ किलो सोयाबीन, १०० रूपयांचे कापड व १०० रूपयाचे फेविकाॅल असे एकूण ९०० रूपयाचे साहित्य लागले. सोयाबीनपासून साकारलेेल्या या गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

------

दरवर्षीच पर्यावरणपूरक उत्सवावर भर

कामरगाव येथील जय भवानी जय शिवाजी गणेशमंडळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ओळखले जाते. या गणेश मंडळाने यंदाही आपली परंपरा कायम राखली असून, गणेश मंडळाच्या सदस्यांनी यंदा २० दिवस परिश्रम घेऊन केवळ ९०० रुपयांच्या खर्चातून आणि ७ किलो सोयाबीन बियापासून आकर्षक अशी पर्यावरपूरक मूर्ती तयार करून तिची स्थापना केली आहे.

120921\12wsm_3_12092021_35.jpg

सोयाबीनपासून निर्मित गणेशाची स्थापना 

Web Title: Establishment of Ganesha made from soybean in Kamargaon