शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजार शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकात त्रूटी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 13:59 IST

दोन दिवसात अर्थात ७ जानेवारीपर्यंत त्रूटी दूर न झाल्यास संबंधित शेतकºयांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गंत आधार क्रमांकात त्रूटी असलेल्या ९५ हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास ६७ हजार शेतकºयांनी ५ जानेवारीपर्यंत ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर अँड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून दुरूस्ती केली असून, अद्याप २८ हजार शेतकºयांच्या आधार क्रमांकात त्रूटी कायम आहेत. दोन दिवसात अर्थात ७ जानेवारीपर्यंत त्रूटी दूर न झाल्यास संबंधित शेतकºयांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार १०० शेतकरी कुटूंबाचा डाटा लाभार्थी म्हणून पाठविण्यात आला आहे. यापैकी ९७ हजार ७२७ लाभार्थ्यांच्या आधार संबंधित माहितीमध्ये अंशत: त्रूटी आढळून आलेल्या आहेत. या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) यांच्याकडे आधार कार्ड व बँॅकेच्या पासबुकची छायांकित प्रत देणे अपेक्षित आहे. आधार कार्ड संबधित त्रुटीच्या दुरुस्ती नजिकच्या सीएससी केंद्रातून केल्या जाऊ शकतात. याशिवाय स्वत: लाभार्थ्याना कोणत्याही अ‍ॅन्ड्राइड मोबाईल संचावरुनही आधार संबंधित दुरुस्ती करता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी ‘पीएम किसान डॉट गव्ह. डॉट ईन’ या संकेतस्थळावर जावून होम स्क्रीनवरील हिरव्या पट्टीमधील डावीकडून क्रंमाक आठवर ‘फार्मर्स कॉर्नर’ची सुविधा देण्यात आली आहे. या आॅप्शनचा वापर करून शेतकºयांना आपल्या आधारकार्डमधील दुरुस्ती करता येते. दुरूस्ती करण्याला पाचव्यांदा मुदतवाढ दिली असून, ७ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही २८ हजार ७०० शेतकºयांनी अजून आधार क्रमांकात आवश्यक ती दुरूस्ती केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जिल्ह्यात ५ जानेवारीपर्यंत ९५ हजार शेतकºयांपैकी ६७ हजार शेतकºयांनी दुरूस्ती केली असून, अद्याप २८ हजार ७०० शेतकºयांनी दुरूस्ती केली नाही. आधार क्रमांकातील त्रूटीची पुर्तता करून अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे. त्रूटीची पुर्तता न केल्यास अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्डPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना