शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

९७ हजार लाभार्थींच्या आधार कार्डमध्ये त्रूटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 14:38 IST

संबंधित लाभार्थींनी ५ डिसेंबरपर्यंत त्रूटींची दुरूस्ती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या तब्बल ९७ हजार ५७१ लाभार्थींच्या आधार संबंधित माहितीमध्ये अंशत: त्रूटी असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनात आले आहे. संबंधित लाभार्थींनी ५ डिसेंबरपर्यंत त्रूटींची दुरूस्ती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमिन असलेल्या शेतकऱ्यांना तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे सहा हजर रुपयांची मदत केली जाणार आहे. या योजनेंतर्गत जिल्हयातील १ लाख ४७ हजार १०० शेतकरी कुटूंबाचा डाटा लाभार्थी म्हणून पाठविण्यात आला आहे. यापैकी ९७ हजार ५७१ लाभार्थ्यांच्या आधार संबंधित माहितीमध्ये अंशत: त्रूटी आढळून आलेल्या आहेत. या चुका दूरुस्त करणे अत्यंत आवश्यक असून, आधारकार्डशी संबंधित चुका दूरुस्त न झाल्यास आधार क्रमांकावर आधारित निधी हस्तांतरीत करण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहे. अशा सर्व याद्या येत्या दोन दिवसात प्रत्येक गावात प्रसिध्द करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थींची नावे या यादीत आहे, त्या लाभार्थ्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हीस सेंटरला भेट देवून आधारकार्ड व बचत खाते, पुस्तकांची छायांकित प्रत कॉमन सर्व्हीस सेंटरच्या केंद्र चालकाकडे देऊन आवश्यक दूरुस्ती करुन घ्यावी लागणार आहे. ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत विशेष मोहिमही राबविण्यात येणार आहे. दुरूस्तीसाठी आजपासून जिल्ह्यात विशेष मोहिमप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या ९७ हजार ५७१ लाभार्थींच्या आधार संबंधित माहितीमध्ये अंशत: त्रूटी आहेत. या त्रूटींची दुरूस्ती करताना लाभार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हयात २९ नोव्हेंबरपासून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम ५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या विशेष मोहिमेचा लाभ संबंधित शेतकरी कुटूंबानी घेवून आवश्यक दुरुस्ती करुन घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना