शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांना गेल्या तीन वर्षांपासून शुल्क परतावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 15:11 IST

वाशिम : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव कोट्यातून मोफत प्रवेश देणाऱ्या जिल्ह्यातील अनेक शाळांना गेल्या तीन वर्षांपासून शुल्क परतावा मिळालेला नाही.

ठळक मुद्देज्यावर्षी विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून शाळेत मोफत प्रवेश देण्यात आला, त्याचवर्षी शासनाकडून शुल्क परतावा मिळणे क्रमप्राप्त आहे. शासनाकडून ८० लाख मिळणे अपेक्षित होते. २०१५-१६ मधील ही रक्कम एक कोटी रुपये असून २०१६-१७ मधील १ कोटी रुपये बाकी आहेत. या प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने संस्थाचालक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती ‘मेस्टा’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर यांनी दिली.

वाशिम : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव कोट्यातून मोफत प्रवेश देणाऱ्या  जिल्ह्यातील अनेक शाळांना गेल्या तीन वर्षांपासून शुल्क परतावा मिळालेला नाही. थकीत असलेली ही रक्कम दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक असून या प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने संस्थाचालक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती ‘मेस्टा’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर यांनी मंगळवारी दिली.ज्यावर्षी विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून शाळेत मोफत प्रवेश देण्यात आला, त्याचवर्षी शासनाकडून शुल्क परतावा मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून यासंदर्भात कमालीची उदासिनता बाळगली जात आहे. गडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्यात आला. त्यापोटी शासनाकडून ८० लाख मिळणे अपेक्षित होते. २०१५-१६ मधील ही रक्कम एक कोटी रुपये असून २०१६-१७ मधील १ कोटी रुपये बाकी आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील संस्थाचालकांनी कुठलीच तक्रार न ठेवता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला. ही बाब शासनाने लक्षात घेवून प्रलंबित असलेली शुल्क परताव्याची रक्कम विनाविलंब अदा करावी, अशी संस्थाचालकांची मागणी असल्याचे गडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा