शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणावर भर - रमेश तांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:55 IST

Washim News माध्यमिक शाळांमध्ये ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे.

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळांमध्ये ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. यंदा चित्रकला, शालेय क्रीडा स्पर्धा यासह अन्य परीक्षाही प्रभावित झाल्या आहेत. अकरावीमधील प्रवेश प्रक्रिया पुर्णत्वाकडे येत आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांच्याशी शनिवारी संवाद साधला असता, जिल्ह्यात ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणावर भर दिला जात असल्याचे ते म्हणाले.

कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली नाही. विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिकविण्यात येत आहे?कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या सुचनेनुसार सध्या वर्ग सुरू झाले नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आॅनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल किंवा संगणकाची व्यवस्था नाही, अशा विद्यार्थ्यांना समुदाय पद्धतीने शाळा परिसरात, घरी जाऊन आॅफलाईन पद्धतीने शिकविण्यात येत आहे. यावेळी ‘कोविड-१९’च्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत. त्यानुसार या सुचनांचे पालनही होत आहे. 

अकरावी प्रवेशाबाबत काय सांगाल?जिल्ह्यात यावर्षी आॅफलाईन पद्धतीने शाळा स्तरावरच अकरावीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. आतापर्यंत ही प्रवेश प्रक्रिया ८० टक्के पूर्ण झाली आहे. शासकीय व अनुदानित शाळेत अकरावी प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारू नये, अशा सूचना दिलेल्या आहेत. कुणाच्या तक्रारी असतील तर शिक्षण विभाग स्तरावर तक्रारीचे निराकरण करण्याची व्यवस्थादेखील केली आहे. दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या तुलनेत अकरावीतील प्रवेशित जागांची संख्या जास्त असल्याने प्रवेशापासून कुणीही वंचित राहणार नाही.

कोरोनामुळे चित्रकला परीक्षा, शालेय क्रीडा स्पर्धा प्रभावित झाल्या, याबाबत काय सांगाल?कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा स्तरावर गर्दी होणार नाही, याची दक्षता वरिष्ठ स्तरावरूनच घेतली जात आहे. शाळा सुरू झाल्यानंतर चित्रकला परीक्षा, शालेय क्रीडा स्पर्धा व अन्य मुद्याच्या अनुषंगाने वरिष्ठ स्तरावर योग्य तो निर्णय होईल. या निर्णयाची अमलबजावणी जिल्ह्यात केली जाईल.

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासंदर्भात आतापर्यंत मुख्याध्यापकांच्या तीन ते चार वेळा आॅनलाईन पद्धतीने बैठका घेण्यात आल्या. विद्यार्थी, पालकांच्या तक्रारींचा निपटारा शक्यतोवर शाळा स्तरावर करावा, अशा सूचना सर्वांना दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतEducationशिक्षण