शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

५६ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमणाचे निर्मूलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 11:21 IST

मसला खु. गावातील ५६ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण निर्मुलन वाशिम वनविभागाने सुरू केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये शासनाच्या अधिसूचनेनुसार वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४५० हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे. हे अतीक्रमण हटविण्याकामी झालेले प्रशासकीय प्रयत्न पूर्णत: निष्फळ ठरत होते. त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देश असफल ठरत होता. आता हे अतिक्रमण हटविण्यात येत असून, मालेगाव तालुक्यातील मसला खु. गावातील ५६ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण निर्मुलन वाशिम वनविभागाने सुरू केले आहे. या प्रकरणी पोलिस विभागाचे सहकार्य मिळत आहे.वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये शासनाच्या अधिसूचनेनुसार वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४५० हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे. जिल्ह्यात वाशिम वनविभागांतर्गत वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव असे चार वनपरिक्षेत्र असून, ४१ हजार ९७१.६६ हेक्टर जमिनीवर वनक्षेत्राचा विस्तार झालेला आहे. दरम्यान, शासनस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हावी, या उद्देशाने राखीव वनक्षेत्र घोषित करण्याच्या अधिसूचनेनुसार महसूल विभागाकडून ४७९४.१४ हेक्टर ई-क्लास जमीन वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. त्यापैकी काही क्षेत्रातील जमिनीवर संबंधित त्या-त्या गावातील तसेच आसपासच्या काही लोकांनी अतिक्रमण करून जमीन वहितीखाली आणली आहे.

शासनाच्या ‘अ‍ॅक्शन प्लान’नुसार कारवाईवनजमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यासाठी राज्यशासनाने अ‍ॅक्शन प्लान तयार केला आहे. यासाठी ‘गूगल अर्थ’चा आधार घेण्यात आला असून, वनविभागाकडे वनजमिनीवर असलेल्या अतिक्रमणाची नोंदीची पडताळणी करून कार्यवाही करण्यात येत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९७३ अंतर्गत वनजमिनीवरील अतिक्रमणावर कारवाईचे अधिकार असून, नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार आता वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यासाठीच अ‍ॅक्शन प्लान तयार करण्यात आला आहे. याच अ‍ॅक्शन प्लाननुसार जिल्ह्यातील वनजमिनीवरचे अतिक्रमण हटविण्यात येत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमforestजंगल