वाशिम : वीज वितरण कंपनीच्यावतीने वीज दर वाढीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. या नव्यो प्रस्तावामुळे सर्व सामान्य घरगुती वीज ग्राहक, व्यावसायािकंचे कंबरडे मोडणार आहे. या विज वितरण कंपनीच्या धोरणाचा निषेध म्हणून शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्थानिक पुसद नाका भागात वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात मोठया संख्येने नागरिक, व्यावसायीकांनी सहभागी होण्याचे आवाहन वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू चौधरी यांनी केले आहे. विज वितरण कंपनीच्या वतीने शासनास सादर केलेल्या प्रस्तावानुसार सबसिडी रद्द करुन घरगुती, तसेच व्यावसायीक विद्युत ग्रहाकांवर २0 ते २२ टक्के दरवाढीचा बोजा लादण्यात येणार आहे. तसेच उद्योगांसाठी असलेले राज्यातील विजेचे दर शेजारील राज्यांच्या तुलनेत दिड पट ने दुप्पट वाढणार आहेत. त्याच प्रमाणे नोंव्हेंबर २0१४ पासून रद्द केलेले सवलतीचे दर कायम ठेवणे, १२ टक्के वीज दरवाढ करु नये, तसेच फोटोव्दारे घेण्यात येणारे मिटर रिडींग चुकीच्या पद्धतीने करु नये याबाबत जिल्हा विज ग्राहक संघटनेच्या वतीने शुक्रवारी २७ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता स्थानिक पुसद नाका भागात विज बिलांची होळी करण्यात येणार आहे; तरी या आंदोलनात मोठया संख्येने घरगुती वीज ग्राहक, व्यावसायीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा विज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष राजू चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.
वीज बिलांची होळी
By admin | Updated: February 27, 2015 01:02 IST