शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जोडणी खंडीत केल्यानंतरही ग्राहकाला वीज देयक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:29 IST

मंगरुळपीर (वाशिम): ४ डिसेंबर २०१८ मध्ये वीज जोडणी खंडीत केलेल्या वीजग्राहकाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील वीज वापराचे देयक आकारण्याचा प्रताप महावितरणकडून करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): ४ डिसेंबर २०१८ मध्ये वीज जोडणी खंडीत केलेल्या वीजग्राहकाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील वीज वापराचे देयक आकारण्याचा प्रताप महावितरणकडून करण्यात आला आहे. मंगरुळपीर उपविभागांतर्गत शहर विभागात हा प्रकार घडला आहे.महावितरणच्यावतीने ग्राहकांना अवाजवी देयके आकारणे , वीज जोडणी देण्यापूर्वीच देयके आकारणे, कोटेशन भरल्यानंतही ग्राहकांच्या यादीत नाव नसणे, आदि प्रकार यापूर्वी घडले असताना आता वीज जोडणी खंडीत केल्यानंतरही वीज देयक आकारण्याचा नवाचा प्रकार होत असल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर येथील शहरी भागातील विजय रामचंद्र खडसे, असे या ग्राहकाचे नाव असून, त्यांचा ग्राहक क्रमांक ३१६१२३७८७५०९ हा आहे. त्यांनी मंगरुळपीर उपविभागांतर्गत काही वर्षांपूर्वी वीज जोडणी घेतली होती. तांत्रिक कारणामुळे ४ डिसेंबर २०१८ रोजी त्यांची वीज जोडणी खंडीत करण्यात आली. त्यानंतरही डिसेंबर २०१८ या संपूर्ण महिन्यात ६० युनीट वीज वापरापोटी ४९३० रुपये, तर जानेवारी महिन्यात ५४८ युनिटच्या वीज वापरापोटी ६३२० रुपयांचे वीज देयक त्यांना देण्यात आले आहे. हा प्रकार पाहून वीजग्राहक थक्क झाला आहे. वीज जोडणी खंडीत झाल्यानंतरही सदर ग्राहकाच्या वीज वापराचा अंदाज कसा लावण्यात आला आणि आकारणी कोण्या आधारावर करण्यात आली, हा प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होत असून, महावितरणची कार्यपद्धतीही यामुळे संशयाच्या भोवºयात सापडली आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणMangrulpirमंगरूळपीर