शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

आज निवडणुकीतील चित्र होणार स्पष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:11 IST

वाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६०५८ उमेदवारी अर्ज कायम असून, २७ सप्टेंबर रोजी कोण माघार घेणार यावर निवडणुकीतील पुढील चित्र अवलंबून आहे. दरम्यान, बंडखोरी होऊ नये तसेच ग्रामपंचायत अविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांतर्फे माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ७ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६०५८ उमेदवारी अर्ज कायम असून, २७ सप्टेंबर रोजी कोण माघार घेणार यावर निवडणुकीतील पुढील चित्र अवलंबून आहे. दरम्यान, बंडखोरी होऊ नये तसेच ग्रामपंचायत अविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांतर्फे माघार घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचे दिसून येते. आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक  ७ आॅक्टोबर रोजी होत आहे. वाशिम तालुक्यातील ५१ ग्राम पंचायती, कारंजा ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २२ सप्टेंबरपर्यंत दाखल ६१६२ उमेदवारी अर्जाची सोमवार, २५ सप्टेंबर रोजी तहसिल स्तरावर छाननी करण्यात आली. छाननीत १०४ अर्ज बाद झाल्याने आता ६०५८ अर्ज कायम आहेत. यामध्ये वाशिम तालुक्यातील सदस्य पदाचे ९५६ व सरपंच पदाच्या २९४ अशा एकूण १२५० अर्जांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील सदस्य पदाचे ७४१ व सरपंच पदाच्या २३८ अशा एकूण ९७९ अर्जांचा समावेश आहे. मानोरा तालुक्यातील सदस्य पदाचे ६५९ व सरपंच पदाच्या १८५ अशा एकूण ८४४ अर्जांचा समावेश आहे. रिसोड तालुक्यातील सदस्य पदाचे ८५३ व सरपंच पदाच्या २१६ अशा एकूण १०६९ अर्जांचा समावेश आहे. मंगरूळपीर तालुक्यातील सदस्य पदाचे ६३६ व सरपंच पदाच्या २०२ अशा एकूण ८३८ अर्जांचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यातील सदस्य पदाचे ८३२ व सरपंच पदाच्या २४६ अशा एकूण १०७८ अर्जांचा समावेश आहे. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. अंतिम मुदतीपर्यंत किती उमेदवार माघार घेतात, यावर निवडणुकीतील चित्र अवलंबून राहणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकी ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी पक्षाचे समर्थक, पक्षाच्या कार्यकर्त्यांना ग्राम पंचायतच्या सत्तेत बसविण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारीप-बमसं या प्रमुख पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून येते. आगामी डिसेंबर २०१८ मध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत निवडणूक ही रंगीत तालिम ठरत असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची कसोटी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करणे तसेच बंडखोरांना शांत करण्यासाठी स्थानिक नेते, आघाडी प्रमुखांनी उमेदवारांनी माघार घेण्याकरिता प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. या प्रयत्नांना कितपत यश येते, हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर स्पष्ट होणार आहे.