शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

वाशिम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत आठ शिक्षक प्रतिनियुक्तिवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 3:54 PM

वाशिम - येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आठ  शिक्षकांना विषय सहाय्यक म्हणून प्रतीनियुक्तीवर घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात अनेक अंशकालीन प्रशिक्षित उच्च पदवीधर असताना त्यांचा विषय शिक्षक म्हणून रोजगारासाठी विचार होणे आवश्यक होते. तसे न होता प्राथमिक शाळेवर सेवेत असणाºयांनाच पुन्हा संधी देवून सुशिक्षित बेरोजगारांवर आणखी बेकार होण्याची वेळ आणली आहे.प्रतीनियुक्तीवर असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे यावर्षीही शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 वाशिम - येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आठ  शिक्षकांना विषय सहाय्यक म्हणून प्रतीनियुक्तीवर घेण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असून, सदर प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेने प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे शुक्रवारी केली. वास्तविक पाहता ते ग्रामीण भागातील शिक्षक असून विद्यार्थी घडविणे हे त्यांचे कर्तव्य आहे.  वाशिम जिल्ह्यात अनेक अंशकालीन प्रशिक्षित उच्च पदवीधर असताना त्यांचा विषय शिक्षक म्हणून रोजगारासाठी विचार होणे आवश्यक होते. पण तसे न होता प्राथमिक शाळेवर सेवेत असणाºयांनाच पुन्हा संधी देवून सुशिक्षित बेरोजगारांवर आणखी बेकार होण्याची वेळ आणली आहे. तसेच अगोदरच काही शाळांवर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षक देण्याची मागणी वेळोवेळी पालकांमधून होते. दुसरीकडे आठ शिक्षक प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आल्याने शिक्षकांची अधिक पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे. पदवीधर शिक्षक असून इयत्ता पाच ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकविणे हे त्यांचे कर्तव्य आहे. परंतु ते प्रतीनियुक्तीवर असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे यावर्षीही शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे शासन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम चालू ठेवते. दुसरीकडे शिक्षकांनी प्रतिनियुक्तीवर अन्यत्र पाठविले जाते. हा प्रकार थांबविण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेने शुक्रवारी दिला.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक