शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरितांच्या पाल्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 16:51 IST

शेलगाव बोदाडे येथील राजीव गांधी विद्यालयातील शिक्षक व स्काऊट, गाईडच्या पथकाने बुधवारी मोफत पाठ़्य पुस्तकांचे वितरण करून त्यांना शाळेत येण्याचे आवाहन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दुष्काळी स्थितीमुळे रोजगारासाठी भटकंती करीत असलेल्या मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित होत आहेत. अशाच काही मजुरांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोदाडे येथील राजीव गांधी विद्यालयातील शिक्षक व स्काऊट, गाईडच्या पथकाने बुधवारी मोफत पाठ़्य पुस्तकांचे वितरण करून त्यांना शाळेत येण्याचे आवाहन केले. गतवर्षीच्या अल्प पावसामुळे राज्यातील हजारो गावांत दुष्काळ पडला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागांतील लाखो शेतमजुरांनी रोजगारासाठी परजिल्ह्यात स्थलांतर केले आहे. त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहे.  वाशिम जिल्ह्यातील रिसोडसह मानोरा तालुक्यातील आणि बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील हजारो मजुरांनीही कामानिमित्त स्थलांतर केले असून, बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील काही मजूर मालेगाव तालुक्यात दगड फोडण्याच्या कामासाठी मुलाबाळासह आले आहेत. हे मजूर शेलगाव ते वाघळूद या रस्त्याच्या कामावर दगड फोडून आपल्या कुटुंबाचे उदरभरण करीत आहेत. त्यांच्यासोबत काही मुलेही असल्याची बाब शेलगाव बोदाडे येथीलराजीव गांधी विद्यालयाचे शिक्षक, तसेच राजीव गांधी स्काऊट पथक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गाईड पथकाच्या लक्षात आली. त्यामुळे या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून शालेय साहित्य खरेदी करून या मुलांना वितरीत केले, तसेच त्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण केली. स्काऊट शिक्षक पी. एम.कुटे यांनी २० पाट्या, लेखन डब्बे व गाईडनी वह्या, पेन्सील आणल्या. हे साहित्य मुख्याध्यापक व्ही. एस. जाधव यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक व काही पालकही ऊपस्थित होते. या उपक्रमासाठी ऋषिकेश वाझुळकर, गोपाल वाळले, गोपाल वाझुळकर, विशाल वाझुळकर, चेतन लहाने, तसेच भुमिका वाझुळकर, राजेश्वरी वाझुळकर, प्रांजल इंगोले, सानिका लहाने, स्नेहा खंदारे, वर्षा वाझुळकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी