शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शाळांतर्गत शैक्षणिक सहली बंद होण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 02:01 IST

मालेगाव : विद्यार्थी दशेत सदोदित हवीहवीशी वाटणारी शैक्षणिक सहल विविध स्वरूपातील जाचक अटींमुळे कायमची बंद होण्याच्या मार्गावर आहे. सहलीकरिता केवळ परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसचाच वापर करण्याचे बंधन असून, यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधी तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांकडून उदासीनता बाळगली जात असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून एकही सहल निघाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देजाचक अटींमुळे वाढल्या अडचणी शिक्षकांचा त्रास बळावला!

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : विद्यार्थी दशेत सदोदित हवीहवीशी वाटणारी शैक्षणिक सहल विविध स्वरूपातील जाचक अटींमुळे कायमची बंद होण्याच्या मार्गावर आहे. सहलीकरिता केवळ परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसचाच वापर करण्याचे बंधन असून, यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधी तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांकडून उदासीनता बाळगली जात असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून एकही सहल निघाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.शिक्षण उपसंचालकांकडून गतवर्षी जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी एस.टी. बस अथवा अन्य शासकीय मान्यताप्राप्त असलेल्या तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी मंजुरी दिलेल्या वाहनांमधूनच सहल काढता येऊ शकते. मात्र, एस.टी. बसेस उपलब्ध करण्यासाठी शाळांची पुरती धांदल उडत असून, आगार व्यवस्थापनाशी संपर्क साधण्यापासून बस उपलब्ध होईपर्यंत मोठा कालावधी लागत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांचे पालक, संस्थाध्यक्ष, शिक्षण विभागाची परवानगीदेखील यासाठी बंधनकारक असल्याने बहुतांश शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी शैक्षणिक सहल काढण्याबाबत उदासीनता बाळगली आहे. त्यामुळे यासंदर्भातील जाचक अटींमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

शैक्षणिक सहलीदरम्यान अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने काही नियम घालून दिले आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच बाहेर जगाचीही माहिती व्हावी, यासाठी शैक्षणिक सहल आवश्यक असून, त्यासाठी शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी अटींची पूर्तता करून शैक्षणिक सहलींचे आयोजन करायला हवे. - डॉ. ज्ञानेश्‍वर नागरेमाध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी