शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दत्त जयंतीनिमित्त गुरुमंदिरात भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:27 IST

कारंजा :  दत्त जयंतीनिमित्त दर्शनासाठी शहरातील विविध मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. २२ डिसेंबर रोजी दत्त जयंतीचे औचित्य साधून कारंजा शहरातील प्रसिध्द अशा गुरूमंदिरात व दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  दत्त जयंतीनिमित्त दर्शनासाठी शहरातील विविध मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. २२ डिसेंबर रोजी दत्त जयंतीचे औचित्य साधून कारंजा शहरातील प्रसिध्द अशा गुरूमंदिरात व दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी ‘दिगांबरा दिगांबरा श्रीपाद वल्लभ दिगांबरा’ च्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. तसेच यावेळी भाविकांनी दर्शनाचा, आयोजित धार्मिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.  मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव अर्थात दत्तजयंती साजरी करण्यात येते. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी ठिकाणची दत्तमंदिरे प्रसिध्द आहेत. कारंजात दत्ताचा अवतार मानल्या जाणाºया स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांचे प्रशस्त असे मंदिर आहे. या मंदिरात २२ डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त दुपारी ३ ते ६ या वेळेत  अविनाश बुवा परळीकर यांची जन्माचे किर्तन त्यानंतर आचार्य पाठक गुरूजी व अरूण शास्त्री खेडकर यांचे अध्याय वाचन तसेच सायंकाळी ७ ते १० या वेळेत मंदिरात श्रींची पालखी, काढण्यात आली. तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शहरातील दत्त मंदिरात देखील दत्त जयंती निमित्त दत्त जन्म उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दर्शनासाठी व आयोजित धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांची गर्दी दिसून आली.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाIndian Festivalsभारतीय सण