शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मिरवणूकीदरम्यान शिरपूरजैन येथे दोन गटात हाणामारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 14:35 IST

शिरपूरजैन (वाशिम) : गणेश मिरवणूकीदरम्यान जुन्या वादातून येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवार, २३ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली.

पोलिसांत परस्परविरूद्ध तक्रारी : आरोपींविरूद्ध गुन्हे दाखललोकमत न्यूज नेटवर्कशिरपूरजैन (वाशिम) : गणेश मिरवणूकीदरम्यान जुन्या वादातून येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवार, २३ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरूद्ध दाखल तक्रारींवरून पोलिसांनी दोन्ही गटातील ६० पेक्षा अधिक लोकांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी आकाश दत्ता इरतकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की ते अध्यक्ष असलेल्या हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक गजानन इरतकर यांच्या घराजवळून जात असताना वैभव चोपडे, रमेश इरतकर, गजानन शंकर भांदुर्गे, सुभाष इरतकर, प्रकाश इरतकर, विठ्ठल इरतकर, आकाश इरतकर, गोपाल चोपडे, निखील इरतकर, राजू इरतकर, गोपाल इरतकर, योगेश वानखेडे, रामू इरतकर, गजानन इरतकर, संजय भांदुर्गे, रवि भांदुर्गे, गजानन कैलास भांदुर्गे, स्वाती गजानन भांदुर्गे, अन्नपूर्णा कैलास भांदुर्गे आदिंनी मंडळातील लोकांवर लाठ्या-काठ्या, दगडाने हल्ला चढविला. लोकांवर मिरचीपूड फेकून शिविगाळ केली. या मारहाणीत दत्ता इरतकर, बबन दशरथ भांदुर्गे, अंकुश विलास भांदुर्गे, लता विजय भांदुर्गे हे जखमी झाले. अशा आशयाच्या आकाश इरतकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद आरोपींविरूद्ध कलम ३२३, ३२४, ३४१, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले.दुसºया गटाकडून अन्नपूर्णा कैलास भांदुर्गे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की २३ सप्टेंबर रोजी हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाची मिरवणूक इरतकर गल्लीतून येत असताना विजय भांदुर्गे, लक्ष्मण भांदुर्गे, अंकुश भांदुर्गे, मंगेश भांदुर्गे, बाळू उर्फ आकाश इरतकर, लता विजय भांदुर्गे, उषा लक्ष्मण भांदुर्गे यांच्यासह २० ते २५ लोकांनी जुन्या वादावरून मला मारहाण केली, शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुसºया गटातील नमूद आरोपींविरूद्ध कलम ३२३, ३२४, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीShirpur Jainशिरपूर जैन