शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पीक पंचनामे लांबणीवर; नुकसानग्रस्त शेतकरी वाऱ्यावर!

By संतोष वानखडे | Updated: March 19, 2023 18:04 IST

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पीक पंचनामे लांबणीवर पडत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 

वाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तर दुसरीकडे कर्मचारी संपामुळे नुकसानग्रस्त भागातील पीक पंचनामेही लांबणीवर पडत आहेत. यामुळे शासनदरबारी अहवाल केव्हा  पोहचतील आणि मदत केव्हा मिळेल? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात १४ ते १६ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर १७ मार्चला मालेगाव व मंगरूळपीर तालुक्यात गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. १८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजतानंतर वाशिमसह जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस व गारपिट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली. नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह उच्चस्तरीय यंत्रणेने दिलेले आहेत. मात्र, सध्या जून्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपात इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक सहभागी झाले आहेत. पीक पंचनाम्याच्या प्रक्रियेत नेमके हेच कर्मचारी अग्रस्थानी असतात. जवळपास ९० टक्क्यापेक्षा अधिक संख्येने तलाठी, ग्रामसेवक, कृषी कर्मचारी संपात असल्याने, पंचनाम्यासाठी प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. परिणामी, नुकसानग्रस्त भागातील पीक पंचनामेदेखील लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.   शेतात गारपिटीचा खच! १८ मार्चला मंगरूळपीर, मानोरा , कारंजा, वाशिम तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिट झाली. मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात अनेक ठिकाणी शेतात गारपिटीचा खच पडून असल्याचे पाहावयास मिळाले. गारपिटीमुळे गहू, हरभऱ्यासह फळबागा, भाजीपालावर्गीय पिकांचे  प्रचंड नुकसान झाले.

 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस