पाण्याची पातळी खालावल्याने विहीर, कूपनलिका आटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST2021-03-20T04:41:03+5:302021-03-20T04:41:03+5:30

यासंदर्भात गावकऱ्यांनी मंत्र्यांपासून तर तहसीलदारापर्यंत निवेदन दिले परंतु त्यांच्या निवेदनाची दखल काेणी घेत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. निवेदनानुसार पीएनसी कंपनीच्या ...

Due to lowering of water level, wells and coupon pipes were blocked | पाण्याची पातळी खालावल्याने विहीर, कूपनलिका आटल्या

पाण्याची पातळी खालावल्याने विहीर, कूपनलिका आटल्या

यासंदर्भात गावकऱ्यांनी मंत्र्यांपासून तर तहसीलदारापर्यंत निवेदन दिले परंतु त्यांच्या निवेदनाची दखल काेणी घेत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. निवेदनानुसार पीएनसी कंपनीच्या गिट्टी क्रेशरच्या अवैधपणे केलेल्या अति खाेदकामामुळे नारेगावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्राेत कमी झाल्याचे म्हटले आहे. सदर कंपनीने जवळपास ९० फुटापर्यंत खाेदकाम केले आहे. याची ग्रामपंचायतला काेणत्याची प्रकारची कल्पना सुद्धा नाही. आजपर्यंत येथे कधीच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा उद्भवला नाही, परंतु यावर्षी झालेल्या खाेदकामामुळे गावात तीव्र पाणी टंचाईची शक्यता दिसून येत आहे. याची पाहणी करुन न्याय द्यावा व खाेदकाम थांबविण्याची मागणी ग्रामपंचायत माेहगव्हाण नारेगाव सह गावकऱ्यांनी केली आहे. ग्रामपंचायत तर्फे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, कृषी आयुक्त, कृषी मंत्री यांच्यासह संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

................

Web Title: Due to lowering of water level, wells and coupon pipes were blocked