शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

निधीच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील धरणांची देखभाल, दुरूस्ती वांध्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:33 IST

निधी अत्यंत तोकडया स्वरुपातील राहत असल्याने ही स्थिती उद्भवली असून खर्च भागविणे कठीण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात छोटी-मोठी मिळून १५० धरणे आहेत. यामाध्यमातून त्यांची देखभाल दुरुस्ती दरवर्षी होणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. शासनाकडून पाठविला जाणारा निधी अत्यंत तोकडया स्वरुपातील राहत असल्याने ही स्थिती उद्भवली असून खर्च भागविणे कठीण झाले आहे. या समस्येमुळे लघुपाटबंधारे विभागही हतबल झाला आहे.जिल्ह्यातील धरणांमधून दरवर्षी रब्बी हंगामात कालव्यांव्दारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. त्यामुळे हे कालवे हंगामापुर्वी स्वच्छ करून तुटफूट झाल्यास त्याची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. यासह धरणावरील भिंतींवर उगवणाऱ्या झाडांची वेळोवेळी कटाई करणेही आवश्यक ठरत असून या महत्वाच्या कामांकडे लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, लघू पाटबंधारे विभागास जिल्ह्यातील १५० धरणांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी मिळणारा निधी अत्यंत तोकड्या स्वरूपात असून त्यातून कालवे दुरूस्ती, धरणांच्या भिंतींवरील झाडांची कटाई, पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण, धरणांवरील कर्मचाऱ्यांचे मानधन आदी खर्च भागविणे अशक्य होत असल्याची माहिती प्राप्त झाली. परिणामी, दरवर्षी तालुकानिहाय केवळ दोन ते तीनच प्रकल्पांची देखभाल-दुरूस्ती शक्य होत आहे. बहुतांश धरणांची स्थिती मात्र अत्यंत दयनिय असून अनेक ठिकाणचे कालवे नादुरूस्त असल्याने रब्बी हंगामातील सिंचनावर त्याचा परिणाम जाणवत असल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यात लघूपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित १५० धरणे येतात. त्यात बहुतांश धरणांची व्याप्ती तुलनेने मोठी आहे. या सर्व धरणांची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी साधारणत: २ कोटींचा निधी मिळतो. यंदा तर तो १.८० कोटीच मिळाला. एवढ्या कमी पैशातून देखभाल-दुरूस्तीसह इतरही खर्च भागविणे कठीण होत आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरही पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.- प्रशांत बोरसे, कार्यकारी अभियंता, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प