शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चारा, पाणीटंचाईमुळे दुध उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 15:34 IST

शिरपूर (वाशिम): वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक दुधाळ जनावरे असलेल्या शिरपूर परिसरात चारा आणि पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर (वाशिम): वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक दुधाळ जनावरे असलेल्या शिरपूर परिसरात चारा आणि पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. याचा परिणाम गुरांच्या आरोग्यावर होत असल्याने दूध उत्पादनात घट आली असून, सरासरी चार हजार लिटर दूध संकलन होणाºया तीन केंद्रांवर आता केवळ ७०० लिटर दुधाचे संकलन होत आहे. उन्हाचा पारा अद्यापही ४४ अशांच्या जवळपास आहे. या उन्हाचा परिणाम गुरांच्या आरोग्यावर होत असतानाच चारा आणि पाणीटंचाईची समस्याही उग्र झाली आहे. त्यातच ढेपेचे दर प्रति किलो ३३ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे दुध उत्पादन घटत आहे. जिल्ह्यात गुरांची संख्या असलेल्या शिरपूर परिसरातील ३२ गावांत दुध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. शिरपूर वगळता आसपासच्या सर्वच गावांत तीव्र पाणीटंचाई व चारा टंचाई निर्माण झाल्याने हा प्रकार होत आहे.   शिरपूर जैन व परिसरात आॅगस्ट ते फेब्रुवारी दरम्यान दरदिवशी ४ हजार लिटर दूध उत्पादन होते. आता मात्र परिस्थिती फार बदलली आहे. आज घडीला दररोज केवळ ७०० लिटर पर्यंतच दूध संकलन होत आहे. त्यामुळे गावातील लोकांची दुधाची गरज भागणे कठीण झाले आहे. त्यातच मुसिलम बांधवांचा पवित्र सण मानला जाणारा रमजान ईद तोंडावर आला असून, या सणानिमित्त मुस्लिम बांधवांना शिरखुर्मा तयार करण्यासाठी दुधाची मोठी गरज असते. सहाजिकच रमजान ईद निमित्त दुधाची मागणी वाढणार आहे; परंतु चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला असल्याने रमजान ईदच्या सणासाठी दुधाच्या मागणीची पूर्तता करणे शक्य होणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे रमजान ईद पाकिटाच्या दुधावर साजरी करावी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनMilk Supplyदूध पुरवठाdroughtदुष्काळ