शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे महामार्ग झाले घसरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 16:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर ( वाशिम ): जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमुळे वाहनधारकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. अर्धवट ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमुळे वाहनधारकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. अर्धवट पुलांमुळे पाऊस आल्यानंतर मार्ग बंद पडत असतानाच या महामार्गाच्या कच्च्या रस्त्यावर पावसामुळे चिखल तयार होत असल्याने वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे अपघाताची भिती वाढली आहे. वाशिम-मंगरुळपीर आणि शेलुबाजार-मंगरुळपीर दरम्यान हे चित्र पाहायला मिळत आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत चार राष्ट्रीय महामार्गांची कामे होत आहेत, तर एका मार्गाचे काम अद्याप सुरू व्हायचे आहे. सध्या सुरू असलेल्या महामार्गांमध्ये मंगरुळपीर-महान, वाशिम-मंगरुळपीर, कारंजा-मंगरुळपीर, मानोरा-मंगरुळपीर, मालेगाव-मेहकर या मार्गांचा समावेश आहे. या महामार्गांच्या कामासाठी कंत्राटदारांनी पूर्वीचे रस्ते खोदून सपाटीकरण केले आहे. हे करताना माती मिश्रीत मुरुमाचा मोठा वापर झाला आहे. त्यामुळे पाऊस आल्यानंतर मार्गावर चिखल तयार होऊन वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. यात दुचाकीसह चारचाकी वाहनेही घसरत असल्याने एखादवेळी समोरून येणाºया वाहनाला धडक लागून मोठा अपघात घडण्याची भिती निर्माण झाली आहे. वाशिम-मंगरुळपीर आणि शेलुबाजार मंगरुळपीरसह मानोरा-मंगरुळपीरदरम्यानच्या कामांवर वाहने घसरण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अभियंत्यांनी या प्रकारात जातीने लक्ष घालून कंत्राटदारांना कच्च्या रस्त्यावर खडी टाकून व्यवस्थित दबाई करण्याच्या सुचना देणे अत्यावश्यक झाले आहे. ----------------------
टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग