शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुले पळविणाऱ्या टोळीविषयीच्या अफवांवर विश्वासू ठेवू नका - पोलिसांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 18:48 IST

वाशिम : सध्या व्हाट्सअप व इतर सोशल मीडियाद्वारे मुले पळवून नेणारी टोळी, चोरी याविषयी अफवा पसरविल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून केवळ संशयातून मारहाणीसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत.

ठळक मुद्देअफवांवर विश्वासू ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सोमवारी केले. गावात, शेतवस्तीवर येणारे अपरिचित, मनोरुग्ण, भटके साधू वेशातील लोक यांना संशयावरून मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत.अफवा पसरवून समाजातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणे हा सुद्धा एक प्रकारचा गंभीर गुन्हा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सध्या व्हाट्सअप व इतर सोशल मीडियाद्वारे मुले पळवून नेणारी टोळी, चोरी याविषयी अफवा पसरविल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून केवळ संशयातून मारहाणीसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. नागरिकांनी सोशल मीडिया अथवा इतर माध्यमातून पसरविल्या जाणाºया अफवांवर विश्वासू ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सोमवारी केले. मुले पळवून नेणाºया टोळीविषयी व्हाट्सअपसारख्या माध्यमातून अफवा पसरवून समाजात भीतीचे वातावरण करण्याचा प्रकार सध्या निदर्शनास आहे. त्यामुळे गावात, शेतवस्तीवर येणारे अपरिचित, मनोरुग्ण, भटके साधू वेशातील लोक यांना संशयावरून मारहाण करण्याचे प्रकार घडत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच अशाप्रकारचे संदेश खात्री न करता पाठवू नयेत. अफवा पसरवून समाजातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणे हा सुद्धा एक प्रकारचा गंभीर गुन्हा आहे. तसेच संशयित इसमांना मारहाण न करता त्वरित आपल्या गावातील पोलीस पाटील, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या ०७२५२-२३४८३४ या क्रमांकावर अथवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. पोलीस प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी कळविले आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस