शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

वाशिम जिल्ह्यात ४३७ वर्गखोल्या शिकस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 16:16 IST

जिल्हा परिषद शाळेच्या ४०९ आणि नगर परिषद शाळेच्या २८ अशा एकूण ४३८ वर्गखोल्या शिकस्त झाल्या असून, या वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी बसण्यायोग्य नाहीत.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एकिकडे शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा भौतिक सुविधांसाठी धडपडत आहेत. वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या ४०९ आणि नगर परिषद शाळेच्या २८ अशा एकूण ४३८ वर्गखोल्या शिकस्त झाल्या असून, या वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी बसण्यायोग्य नाहीत. २६ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार असून ४३७ शिकस्त वर्गखोलीतील विद्यार्थ्यांना अन्य वर्गखोलीत बसावे लागणार आहे.वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ७७८ शाळांमध्ये ६५ हजाराच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी नानाविध प्रयोग केले जात आहेत. लोकसहभागातून शाळांना डिजिटलची जोड दिली जात आहे. मात्र, शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होत नसल्याने शिकस्त वर्गखोल्यांची समस्या गंभीर बनत चालली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या ४०९ आणि नगर परिषद शाळेच्या २८ अशा एकूण ४३७ वर्गखोल्या या विद्यार्थ्यांसाठी बसण्यायोग्य नाहीत. धोकादायक स्थितीत असलेल्या या वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्यासाठी शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधीची प्रतीक्षा आहे. सन २०१९-२० या वर्षात निर्लेखित वर्गखोल्यांची दुरूस्ती सुरू नसल्याने या वर्गखोलीतील विद्यार्थ्यांना संबंधित शाळेतील अन्य वर्गखोलीत बसविण्याची वेळ शिक्षकांवर येणार आहे. वादळवाºयामुळे मंगरूळपीर तालुक्यातील जोगलदरी आणि मालेगाव तालुक्यातील मोहजाबंदी या शाळेवरील टिनपत्रे उडून गेली होती. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. जोगदलरी येथील शिकस्त वर्गखोलीतील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात किंवा अन्य वर्गखोलीत बसविले जाते. निर्लेखित वर्गखोल्यांची (बसण्या योग्य नसलेल्या शाळांची) माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे प्रस्तावित करण्यात आली आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा