शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

असंघटीत कामगारांच्या योजनांवर जिल्हास्तरीय समितीचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 11:03 AM

प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच संनियंत्रण समिती स्थापन केली जाणार आहे.

वाशिम : असंघटीत कामगारांकरीता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापाऱ्यांकरीता राष्ट्रीय निवृत्ती योजना या दोन योजना अंमलात आलेल्या आहेत. या योजनांचा प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच लाभार्थी नोंदणी, योजनेची प्रसिद्धी यासाठी राज्यात प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच संनियंत्रण समिती स्थापन केली जाणार आहे.असंघटीत कामगारांकरीता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापाºयांकरीता राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या दोन योजना भारत सरकारने लागू केल्या आहेत. या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य तसेच जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती तातडीने स्थापन करण्यात यावी, असे निर्देश केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाने १९ नोव्हेंंबर रोजी दिले होते. या निर्देशाच्या अनुषंगाने राज्यातही विचारमंथन झाले आणि या दोन्ही योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्याचे आदेश राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने २८ नोव्हेंबर रोजी दिले होते. या निर्णयानुसार लवकरच राज्यातील जिल्हास्तरावर अंमलबजावणी समिती स्थापन केली जाणार आहे. या दोन्ही योजनांचा लाभ लाभार्थींना मिळावा याकरीता लाभार्थीची नोंदणी करणे, योजनांची प्रसिद्धी यासारख्या बाबी यशस्वीपणे राबविण्यासाठी राज्य व जिल्हास्तरीय समिती कार्य करणार आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी तर सदस्य सचिव म्हणून सरकारी कामगार अकिारी किंवा सहायक कामगार आयुक्त कामकाज पाहणार आहेत. सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा उद्योग अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त, नगर परिषदेचे मुख्याधिकारी यासह एकूण १६ सदस्यांचा समावेश राहणार आहे.प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे लाभार्थी व राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू असलेल्या लघु व्यापाºयांच्या आॅनलाईन पद्धतीने नोंदणीच्या प्रगतीचे परिक्षण व नियंत्रण करणे, क्षेत्रीय स्तरावरील नागरी सुविधा केंद्रे व ई जनसुविधा केंद्राच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, मनरेगा मजूर स्वयंसहायता गट, घरेलू कामगार, वीटभट्टी कामगार, आशा वर्कर्स, अंगणवाडी वर्कर्स, फेरीवाले, रिक्षाचालक, शेतमजूर, इमारत व इतर बांधकाम कामगार यासारख्या असंघटीत कामगारांच्या नोंदणीच्या कामाचे लक्ष्य पूर्ण करणे, तक्रारींचे निराकरण करणे आदी कामे या जिल्हास्तरीय समितीला करावी लागणार आहेत.

टॅग्स :washimवाशिम