रमजान महिन्याविषयी जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:41 AM2021-04-16T04:41:13+5:302021-04-16T04:41:13+5:30

या आदेशानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा ...

District administration issues guidelines regarding the month of Ramadan | रमजान महिन्याविषयी जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

रमजान महिन्याविषयी जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

Next

या आदेशानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करावेत. नमाज पठणाकरिता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये, सार्वजनिक ठिकाणी एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता फिजिकल डिस्टन्सिंग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर आदी) पालन करुन पवित्र रजमान महिना अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा. या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव ३० दिवस दररोज पहाटेपासून उपवास ठेवतात व संध्याकाळी मगरीब नमाजपूर्वी उपवास सोडतात. या सेहरी व इफ्तारच्यावेळी अनेक फळ व अन्नपदार्थ विक्रेते गर्दी करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्त ती उपाययोजना करावी. कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान सण सुरू होण्याच्या व चालू असतानाच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

०००

बाॅक्स

घरातच दुवा पठण करावे

पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लिम बांधव मोठया प्रमाणात मशिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात. परंतु यावेळी कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरिता एकत्र जमू नये. आपापल्या घरातच दुवा पठण करावे. शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्याच्या २६ व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. यानिमित्ताने मुस्लिम बांधव तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात. परंतु यावर्षी सर्व मुस्लिम बांधवांनी हे धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच करावेत.

०००

बांक्स

खरेदीकरिता गर्दी करू नये

पवित्र रमजान महिन्यात बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये. तसेच याबाबत स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी ठरवून दिलेल्या वेळेचे तंतोतंत पालन करावे. धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमांचे आयोजन शासनाच्या नियमांचे पालन करून बंद जागेत शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावे. कोविड-१९ या विषाणूच्या अनुषंगाने राज्यात फौ. दं. प्र. सं. कलम १४४ लागू असल्याने फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नये, तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. या पवित्र रमजान महिन्यात कोणत्याहीप्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी. पवित्र रमजान महिन्यात नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत आवश्यक काळजी घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

Web Title: District administration issues guidelines regarding the month of Ramadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.