शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील दोन हजारावर लाभार्थी शेतकऱ्यांना ‘पेन्शन कार्ड’चे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:39 IST

दोन हजारांपेक्षा अधिक लाभार्थी शेतकºयांना आतापर्यंत ‘पेन्शन कार्ड’चे वितरण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी अंमलात आलेल्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी केलेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लाभार्थी शेतकºयांना आतापर्यंत ‘पेन्शन कार्ड’चे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी रविवार, ८ सप्टेंबरला दिली.१८ ते ४० वर्षे वयोगटातील २ हेक्टरपर्यंत शेती असलेले सर्व शेतकरी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. याअंतर्गत दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करणाºया पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ३ हजार रुपये प्रती महिना पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियास कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची देखील तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. नाव नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शेतकºयांनी नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या लाभाकरिता नोंदणी केली असून संबंधितांना पेन्शन कार्डचे वितरणही करण्यात आले आहे.१ आॅगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह ५५ ते २०० रुपये रक्कम जमा करावी लागणार आहे. सदर रक्कम ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. यात केंद्र शासनाकडून देखील लाभार्थ्यांनी जमा केलेल्या रकमेइतकीच रक्कम जमा केली जाईल. गाव पातळीवर सुविधा केंद्रांमध्ये (कॉमन सर्व्हिस सेंटर) लाभार्थी नोंदणी करण्यात येत असल्याचे शैलेश हिंगे यांनी सांगितले.नोंदणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रेशेतकºयांना त्यांच्या वृद्धपकाळात किमान खर्चाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासनस्तरावरून प्रधानमंत्री किसान मानधन योजना हाती घेण्यात आली. याअंतर्गत वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रती महिना ३ हजार रुपये पेन्शन सुरू होणार आहे. दरम्यान, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांना आधारकार्ड, गाव नमुना ८ ‘अ’, बँक पासबुक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव आदी माहिती सादर करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे कळविण्यात आले. लाभार्थ्यांनी नोंदणीकरिता अन्य कुठेही न जाता प्रामुख्याने जिल्ह्यातील गावागावांमध्ये कार्यान्वित असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांवरच नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी