आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:41 AM2021-07-31T04:41:57+5:302021-07-31T04:41:57+5:30

आदिवासी प्रवर्गातील अपंग, निराधार, परित्यक्त्या, भूमिहीन अशा पात्र नागरिकांना राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती तथा ...

Distribution of Khawati grants to tribal brothers | आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वाटप

आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वाटप

googlenewsNext

आदिवासी प्रवर्गातील अपंग, निराधार, परित्यक्त्या, भूमिहीन अशा पात्र नागरिकांना राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास कार्यालय अकोला यांच्या संयोजनाने तालुक्यामध्ये गरजू आणि पात्र आदिवासी समाजातील नागरिकांचा खावटी अनुदानासाठी सर्व्हे करण्यात आला होता. मानोरा तालुक्यातील आदिवासी समाजातील नागरिकांना खावटी अनुदानअंतर्गत साहित्याचे वितरण करण्यात येणार असून, धावंडा (बालाजीनगर) येथे मानोरा पंचायत समितीच्या सभापती सागर प्रकाश जाधव यांच्या हस्ते २८ पात्र लाभार्थ्यांना खावटी अनुदानांतर्गत किटचे वाटप करण्यात आले.

-----------------

ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसचिवांची उपस्थिती

आदिवासी बांधवांना खावटी अनुदानांतर्गत मानोरा, विठोली, तळप, विळेगाव येथे साहित्य वितरण करण्यात आले. यावेळी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसचिव, तसेच खावटी अनुदान साहित्य वाटप कार्यक्रमाचे समन्वयक जयदेव राठोड आणि ग्रामस्थ हजर होते.

Web Title: Distribution of Khawati grants to tribal brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.