शालेय विद्यार्थ्यांना भेसळयुक्त तांदूळ वाटप.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:42 AM2021-07-31T04:42:06+5:302021-07-31T04:42:06+5:30

कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारांतर्गत धान्याचे वितरण केले जात आहे. मालेगाव तालुक्यातील जऊळका येथील श्री शिवाजी ...

Distribution of adulterated rice to school children. | शालेय विद्यार्थ्यांना भेसळयुक्त तांदूळ वाटप.

शालेय विद्यार्थ्यांना भेसळयुक्त तांदूळ वाटप.

Next

कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारांतर्गत धान्याचे वितरण केले जात आहे. मालेगाव तालुक्यातील जऊळका येथील श्री शिवाजी विद्यालयात १९ जुलै २६ जुलै दरम्यान अंदाजे ४०० विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत तांदूळ वाटप करण्यात आले होते. त्यात जऊळका येथील भागवत सरोदे यांची दोन मुले वैष्णवी व आदित्य, यांनाही तांदूळ मिळाले. घरी नेल्यानंतर तांदूळ पाहिले असता त्यात प्लास्टिक सदृश भेसळ असलेले तांदूळ आढळून आले. त्यामुळे त्यांनी मुख्याध्यापकांकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली असून, मुख्याध्यापकांनी त्वरित दखल घेत गटशिक्षणाधिकारी जी. ए .परांडे यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी व केंद्रप्रमुख मुरलीधर पाटील ,विशेष सहायक तांबेकर साहेब यांनी तांदळाची पाहणी करीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब धोकादायक असल्याने तांदळाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

Web Title: Distribution of adulterated rice to school children.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.