शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. शाळांच्या साफसफाईला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST

वाशिम : गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद आहेत. त्यात पावसाळ्याच्या दिवसांत याकडे दुर्लक्ष झाल्याने जवळपास ९० ...

वाशिम : गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद आहेत. त्यात पावसाळ्याच्या दिवसांत याकडे दुर्लक्ष झाल्याने जवळपास ९० टक्क्यांहून अधिक शाळांत मोठमोठी झुडपे वाढली होती. त्यामुळे या शाळा साप, विंचू यांसारख्या विषारी जिवांचे माहेरघरच बनल्याचे चित्र दिसत होते. लोकमतने बंद जि. प. शाळा बनल्या विषारी जिवांचे माहेरघर, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना शाळांची साफसफाई करण्याचे निर्देश दिले असून, या मोहिमेला सुरुवातही झाली आहे.

कोरोना संसर्गामुळे गतवर्षीच्या सत्रापासून सर्वच प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. सद्यस्थितीत आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा बंदच आहेत. सद्यस्थितीत ऑनलाईन शिक्षणामुळे ५० टक्के शिक्षक या शाळांत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ऑनलाईन पद्धतीने धडे देत आहेत. शाळेच्या साफसफाईकडे मात्र कोणीच लक्ष देत नव्हते. पावसाळ्याच्या दिवसांत शाळेच्या साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने बंद असलेल्या जि. प.च्या शाळांत मोठमोठी झुडपे वाढली होती. त्यामुळे या शाळा साप, विंचू यांसारख्या विषारी जिवांचे माहेरघरच बनल्याचे चित्र दिसत होते. लोकमतने याकडे लक्ष वेधल्यानंतर शाळांच्या साफसफाईला सुरुवात झाली आहे.

---------------

काही ठिकाणी थातूरमातूर साफसफाई

जि. प. शाळांतील सोयीसुविधा व साफसफाई राखण्याची मुख्य जबाबदारी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडेच असते. याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने शाळांत झुडपे वाढली होती. शिक्षण विभागाने शाळांची साफसफाई करण्याचे निर्देश दिल्यानंतरही काही ठिकाणी थातूरमातूर पद्धतीनचे काम होत असल्याचे दिसत आहे.

०००००००००००००००००००००००

वर्गखोल्या साफ करणे आवश्यक

जि. प.च्या शाळा बंद असल्याने शाळेच्या साफसफाईकडे दुर्लक्ष होऊन परिसरात झुडपे वाढली हाेतीच शिवाय वर्गखोल्यांतही मोठ्या प्रमाणात धूळ, कचरा साचल्याचे चित्र बहुतांश शाळांत पाहायला मिळत आहे. कोरोना काळात विलगीकरण कक्ष म्हणून वापरल्यानंतर या वर्गखोल्या बंदच आहेत. त्यामुळे या खोल्यांची साफसफाई करणे आवश्यक आहे.

------------

कोट: जि. प.च्या शाळांची साफसफाई करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत होते. सर्वच मुख्याध्यापकांना गत आठवड्यात शाळांची साफसफाई करण्याचे निर्देश दिले असून, या प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे.

-गजाननराव डाबेराव,

प्रभारी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जि. प., वाशिम.

-------

जिल्ह्यातील एकूण प्राथमिक जि. प. शाळा - ७७५

जि. प. प्राथमिक शाळांवर कार्यरत शिक्षक -३,१००

------------

तालुकानिहाय जि. प., प्राथमिक शाळा व शिक्षक

तालुका - शाळा - शिक्षक

कारंजा - १४७ - ५२४

मानोरा - १३२ - ४७३

मंगरुळपीर- ११९ - ४४०

वाशिम - १३७ - ६२१

रिसोड - १०८ - ४७८

मालेगाव - १३२ - ५६४

210921\21wsm_1_21092021_35.jpg

जि.प. शाळांची साफसफाई